साऊथ वेल्स : परफ्यूम किंवा डिओडरंट म्हटलं की सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनातील वापरणारी वस्तू. कोणाला माईल्ड परफ्यूम आवडतात कर कोणाला स्ट्राँग. मात्र कोणाचा डिओडरंटमुळे मृत्यू होऊ शकतो अशी कधी तुम्ही कल्पना केली आहे का? पण अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
डिओडरंट वापरायला सगळ्यांनाच आवडतं पण 16 वर्षीय ब्रूक रयानला याच कारणामुळे जीव गमवावा लागला. ब्रूकने डिओचा वास घेताच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रूकचा मृत्यू एरोसोलमुळे झाल्याची माहिती मिळाली.
प्रत्येक परफ्यूम किंवा डिओच्या बाटलीवर स्प्रे करण्यासाठी वापरला जाणारा भाग म्हणजे एरोसोल. सोप्या भाषेत म्हटलं तर जिथून डिओ बाहेर पडतो त्याला एरोसोल म्हणतात. एरोसोलला क्रोमिंग सुद्धा म्हटलं जातं.
डिओमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होतो. अशाच केमिकलयुक्त डिओ किंवा परफ्युमचा जास्त प्रमाणात वास घेतल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अति प्रमाणात वास घेतल्यास डिओचे केमिकल शरीराला हानिकारक ठरतात या घटनेवरुन स्पष्ट झालं.
ब्रूकची आई ऐनीने तिच्या मृत्यूची माहिती दिली. त्याचबरोबर तिने इतर पालकांनाही डिओच्या हानिकारक केमिकलबाबत जनजागृती केली. तसेच मुलांना डिओ किंवा परफ्युमपासून लांब ठेवण्याचं आवाहन केलं आहे. एरोसोलबाबतही ब्रूकच्या आईने माहिती दिली आहे. त्यामुळे डिओ किंवा परफ्युमचा अति वापर करु नका.
ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधील घडली आहे. तुम्हीही असे परफ्यूम वापरत असाल तर आताच सावध व्हा. लहान मुलांपासून अशा गोष्टी दूर ठेवा नाहीतर ब्रूकवर जी वेळ आली ती आपल्यावरही येऊ शकते.