दररोज बायकोला थकलेलं पाहून नवऱ्याचा संशय वाढला, अखेर CCTV मुळे सत्य समोर

नवऱ्याला खूप पूर्वीपासून तिच्यावर संशय होता. त्याच्या मनात होतं की, मी तर घरी नसतो आणि मग तरी देखील ती इतकी थकलेली का असते? 

Updated: Apr 10, 2022, 04:46 PM IST
दररोज बायकोला थकलेलं पाहून नवऱ्याचा संशय वाढला, अखेर CCTV मुळे सत्य समोर title=

मुंबई : नवरा-बायकोचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. संसारच्या गाडीला नवरा आणि बायको अशी दोन चाक असतात आणि दोघांनी ही गाडी सोबत खेचायची असते. परंतु या सगळ्यात विश्वास हा खूप महत्वाचा असतो. जेव्हा दोघांमधील विश्वास संपतो, तेव्हा नात्याला तडा जाते आणि संसाराची घड़ी विस्कळीत होते. आज आम्ही तुम्हाला अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहणारी मेलानिया डार्नेलबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या संसारात असाच काहीसा प्रकार घडला.

मेलानियाच्या नवऱ्याला खूप पूर्वीपासून तिच्यावर संशय होता. त्याच्या मनात होतं की, मी तर घरी नसतो आणि मग तरी देखील ती इतकी थकलेली का असते? तिच्याकडे मला द्यायला वेळ का नसतो? त्यामुळे त्याने पत्नीचे सत्य जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली.

पण जेव्हा मेलानियाच्या नवऱ्याने सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा तिच्या नवऱ्याला धक्काच बसला. नंतर त्याने तो व्हिडीओ यूट्यूबवर शेअरही केला. पण जे सत्य समोर आले ते समजल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही.

खरंतर सकाळी उठल्यावर मेलानिया फ्रेश होण्याऐवजी ती खूप दमलेली असायची. ज्यामुळे मेलानियाच्या नवऱ्याला तिच्या या वागण्याचा संशय येऊ लागला की, ती दिवसभर घरी असं काय करत असेल की, तिला इतका थकवा जाणवतोय? परंतु असं असलं तरी, तिच्या नवऱ्याने तिला समजून घेण्याचा किंवा त्यामागील नक्की कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

उलट त्याच्या मनातील संशय आणखी वाढतच गेला. तेव्हा त्याने सीसीटीव्हीची मदत घेतली. तेव्हा त्याच्यासमोर सगळं उघड झालं.

मेलानियाच्या नवऱ्याने त्याच्या बेडरूममध्ये कॅमेरा लावला आणि त्यात त्याला दिसले की, त्याची पत्नी आपल्या मुलांना सांभाळण्यात इतकी थकून जाते की, स्वत:ला  देण्यासाठी तिच्याकडे वेळच नसतो.

नवऱ्याने कॅमेऱ्यात पाहिले की, तिची तीन मुले तिला रात्रभर झोपू देत नाहीत आणि तिला सकाळी लवकर उठावे लागते. तसेच दिवसभर त्यांच्यासाठी जेवण, अंघोळ, नाष्टा, सगळं करावं लागतं. ज्यामुळे पूर्णपणे थकते. शिवाय या गोष्टी तिला एकटीने करायला लागल्यामुळे तिच्याकडे स्वत:साठी देखील वेळ नसतो. 
अशा परिस्थितीत त्या नवऱ्याचे डोळे उघडले आणि आपली बायको आपला मातृधर्म किती चांगल्या प्रकारे पार पाडत आहे त्याच्या लक्षात आले. ज्यामुशळे त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन बायकोची माफी मागितली.

घर सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही. आपल्याकडे भारतात देखील अशा अनेक महिला आहेत, ज्या आपलं घर सांभाळून आपलं काम देखील सांभाळतात. त्याशिवाय मुलं झाल्यानंतर महिलांची जबाबदारी देखील वाढते. मुलं, घर आणि काम हे सगळं करताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे महिलांना केव्हा ही गृहित धरु नका, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा घरातील महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी चार प्रेमाचे शब्द बोलण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे त्यांचा थकवा किंवा स्ट्रेस कमी होण्यात मदत मिळेल.