२०१८ मध्ये भारत होणार जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था - रिपोर्ट

भारत पुढील वर्षी ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. 

Updated: Dec 26, 2017, 09:33 PM IST
२०१८ मध्ये भारत होणार जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था - रिपोर्ट title=

लंडन : भारत पुढील वर्षी ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. 

कुणाचा आहे रिपोर्ट?

सेंटर फॉर इकनॉमिक अ‍ॅन्ड बिझनेस रिसर्च(Cebr) कन्सल्टन्सीच्या २०१८ वर्ल्ड इकनॉमिक लीग टेबलमध्ये ऊर्जा आणि तंत्रांच्या स्वस्त साधनांमुळ वैश्विक अर्थव्यवस्थेत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

काय म्हणतो रिपोर्ट?

भारतही याच ट्रेंडवर पुढे सरकत आहे. यापुढच्या १५ वर्षांपर्यंत टॉप १० सर्वात मोठ्या इकॉनमीजमध्ये एशियाई अर्थव्यवस्थांचा दबदबा वाढत राहणार आहे. Cebr चे डेप्युटी चेअरमन डगलस मॅकविलियम्स म्हणाले की, ‘तात्कालिक झटक्यांनंतरही भारतीय अर्थव्यवस्था २०१८ मध्ये फ्रान्स आणि यूकेच्या पुढे जाणार आणि डॉलरच्या बाबतीत दोघांनाही पछाडत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे’.

विकासाची गती मंदावली

मॅकविलियम्स म्हणाले की, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारताच्या विकासाची गती थोडी मंदावली आहे. याआधी रॉयटर्सचा पोलमध्येही अर्थशास्त्रज्ञांने हेच सांगितलं आहे. चीन २०३२ मध्ये अमेरिकेला मागे सोडत जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते’.

रिपोर्टमध्ये कच्च्या तेलाच्या कमी होणा-या किंमतीमुळे रशियाची अर्थव्यवस्था कमजोर पडण्याची व्यक्त करण्यात आलीये. रशोया २०३२ पर्यंत ११व्या स्थानावरून १७व्या स्थानावर येऊ शकतो.