भारतीय वंशाचा अक्षय ब्रिटनमध्ये ठरला युवा करोडपती

Updated: Oct 17, 2017, 01:08 PM IST
भारतीय वंशाचा अक्षय ब्रिटनमध्ये ठरला युवा करोडपती  title=

 लंडन - भारतीय मूळ वंशाचा १९ वर्षीय अक्षय रूपारेलिया हा ब्रिटनमध्ये सर्वात तरूण कोट्याधीश ठरला आहे.

अक्षय हा एक ऑनलाईन इस्टेट कंपनी चालवतो. Doorstep.co.uk या अक्षयच्या कंपनीने १६ महिन्यात १८ मोठ्या ऑनलाईन कंपन्यांमध्ये समावेश झाला  आहे. तसेच वर्षभरात १ कोटी २० लाख रूपयांचे या कंपनी मूल्य आहे. 
 
 अक्षय अभ्यास करण्यासोबतच हा व्यवसायदेखील सांभाळतो. या व्यवसायासाठी त्याणे नातेवाईकांकडून सात हजार पौंड उधार घेतले होते. आता त्याच्या कंपनीमध्ये सुमारे १२ लोकं  काम करतात. 
 
 अक्षयला ऑक्सफर्ड युनिव्हरसिटीद्वारा अर्थशास्त्र आणि गणित शिकवण्याचीही ऑफर देण्यात आली होती. मात्र अक्षय  त्याच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे. अक्षयचे  वडील केअर वर्कर्स आहेत तर त्याची आई बधिर मुलांच्या शाळेत सहय्यक शिक्षिका म्हणून काम करते.