अंत्यसंस्कार करणारा रोबोट !

मुंबई : आपली कामे करणारा, प्रसंगी आपल्याशी खेळण्यासाठी रोबोट असतो, हे आपल्याला माहित आहे. अनेक चित्रपट, मालिकांमधून आपण त्याचे रूप पाहिले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 28, 2017, 07:59 PM IST
अंत्यसंस्कार करणारा रोबोट ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : आपली कामे करणारा, प्रसंगी आपल्याशी खेळण्यासाठी रोबोट असतो, हे आपल्याला माहित आहे. अनेक चित्रपट, मालिकांमधून आपण त्याचे रूप पाहिले आहे. पण रोबोट माणसावर अंत्यसंस्कार देखील करू शकतो हे सांगितल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. नुकताच एका जपानी कंपनीने अशाप्रकारचा रोबोट तयार केला आहे. तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीचे हे लक्षण आहे. त्यामुळे अजून कोणती कामे रोबोट करेल याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. पण आता चक्क अंत्यसंस्काराचे कामही सोपे होणार आहे. 

जपानमध्ये बुद्धीस्ट पद्धतीने अंत्यसंस्कार करणाऱ्या धर्मगुरुंना पिपर म्हणून ओळखले जाते. त्यांचे काम हा रोबोट करु शकेल असा कंपनीचा दावा आहे. कम्प्युटराईज पद्धतीने मंत्रपठण करणे आणि ड्रम वाजविण्याचे काम हा रोबोट करु शकणार आहे. टोकियोमध्ये नुकत्याच झालेल्या एका प्रदर्शनामध्ये हा रोबोट पाहण्यास मिळाला. 

सॉफ्टबॅंक ग्रुप कॉर्पोरेशनतर्फे २०१४ मध्ये या रोबोटमधील तंत्रज्ञान तयार करण्यात आले होते. जपानमधील अनेक धर्मगुरुंना त्यांच्या समाजाकडून योग्य पद्धतीने अर्थिक साहाय्य करण्यात येत नाही. त्यामुळे अनेकजण त्यांच्या देवस्थानाबाहेर काम करतात. ज्यावेळी हे धर्मगुरु उपलब्ध होणार नाहीत. तेव्हा या रोबोटचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो.

 धर्मगुरु एका अंत्यविधीसाठी १ लाख ४० हजार रुपये घेतात. तर या रोबोची किंमत जवळपास ३० हजार आहे. मात्र व्यक्तीला  हृदय असून तो कोणतीही क्रिया हृदयातून करतो. त्याप्रमाणे रोबोला हृदय आहे का हे पाहण्यासाठी मी या प्रदर्शनाला आलो आहे असे जपानी धर्मगुरु तेत्सुगी मात्सुओ यांनी सांगितले. कोणताही धर्माचा योग्य पाया तयार करण्यासाठी हृदयाची आवश्यकता असते. आतापर्यंत या रोबोच्या साह्याने एकही अंत्यविधी करण्यात आला नसल्याचेही सांगण्यात आले आहे.