इराणमध्ये भूकंप, 18 जण अत्यवस्थ

इराणच्या दक्षिण पूर्व प्रांतात काल (मंगळवार) आणि आज (बुधवार) तीव्र भूकंपाचे धक्केज जाणवले. यात 18 लोक अत्यवस्थ झाल्याचे वृत्त आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 13, 2017, 03:59 PM IST
इराणमध्ये भूकंप, 18 जण अत्यवस्थ title=

बगदाद : इराणच्या दक्षिण पूर्व प्रांतात काल (मंगळवार) आणि आज (बुधवार) तीव्र भूकंपाचे धक्केज जाणवले. यात 18 लोक अत्यवस्थ झाल्याचे वृत्त आहे.

तब्बल आठ लाख 20 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या करमान शहरापासून 56 किलोमिटर अंतरावर असलेल्या परिसरात पहिल्यांदा 5.9 रिष्टर स्केलचा धक्का जाणवला. त्यानंतरही भूकांपाचे काही धक्के जाणवले त्याची तीव्रता 6.2 असल्याचे सांगितले जात आहे.

कारमान पासून 64 किलोमिटर अंतरावर भूकंपाचे केंद्र

बुधवारीही या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. हा धक्का 6.0 रिष्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार (यूएसजीएस) एक वाजनेच्या सुमारास भूकंपाचा धक्का जानवला. कारमान पासून 64 किलोमिटर अंतरावर उत्तरेला या भूकंपाचे केंद्र होते.

18 लोक अत्यवस्थ

दरम्यान, भूकंपाबाबत अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. अंधार आणि लोकांच्या झोपण्याची वेळ असल्याने भूकंपात जीवीत हानी झाली किंवा नाही. तसेच, किती नुकसान झाले याची आकडेवारी मिळू शकली नाही. मात्र, स्थानिक प्रसारमाध्यमातून आलेल्या वृत्तानुसार कालच्या भूकंपात 18 लोक अत्यवस्थ झाले होते.