पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, अखेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याआधी विवाहितेने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. 

Updated: Aug 7, 2022, 02:42 PM IST
पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, अखेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल! title=

Crime News  : सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याआधी विवाहितेने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओमध्ये तिने आपल्या बाबांना सॉरी म्हणत, पती आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप केला. मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या मनदीप कौरने न्यूयॉर्कमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. (Marathi Crime News)

माझ्या आत्महत्येसाठी पती आणि सासरचे लोक जबाबदार आहेत. बाबा, मी  आत्महत्या करत आहे, मला माफ करा, असं मनदीप व्हिडीओमध्ये मनदीप पंजाबी भाषेत बोलत आहेत. मनदीपच्या पतीचं नाव रणज्योत वीर सिंह असं आहे. 

रणज्योत आणि मनदीप यांचं 2015 साली लग्न झालं होतं. लग्नानंतर 3 वर्षांनी रणज्योत मनदीपला घेऊन न्यूयॉर्कमध्ये गेला. मनदीपने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. मात्र रणज्योतच्या घरच्यांना मुलगा हवा होता. दोन्ही मुली झाल्यामुळे रणज्योत मनदीपला मारहाण करायचा. दारूच्या नशेत मनदीपला मारहाण करून खोलीमध्ये कोंडून ठेवायचा. मनदीपला तिचा पती मारहाण करत असतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मनदीप या त्रासाला कंटाळून गेली होती, तरीही तिने माहेरच्यांना याबाबत काही सांगितलं नव्हतं. 

 

मनदीप मुकाटपणे हा त्रास सहन करत होती. किती दिवस हा जाच सहन करणार, सगळ लवकरच ठीक होईल या आशेवर मनदीप होती मात्र रोजच्याच त्रासाला कंटाळून अखेर तिने आपली जीवनयात्रा संपवली. रणज्योतला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केल्याची माहिती समजत आहे. मुलीच्या मृत्यूने दु: खी झालेल्या मनदीपच्या कुटूंबियांनी रणज्योतला फाशी देण्याची मागणी केली आहे.