फुकट कोरोना व्हॅक्सिनवर पाकिस्तानचा डोळा; जनतेला सोडलं वाऱ्यावर

 पाकिस्तानी सरकारने कोरोना लस न खरेदी करण्याचा निर्णय  घेतला आहे.

Updated: Mar 6, 2021, 11:55 AM IST
फुकट कोरोना व्हॅक्सिनवर पाकिस्तानचा डोळा; जनतेला सोडलं वाऱ्यावर title=

इस्लामाबाद : पाकिस्तानचे नागरिक कोरोना संसर्गामुळे हैराण आहेत. परंतु पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan ) यांना त्याची फारशी चिंता नाही. इम्रान यांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी सरकारने कोरोना लस न खरेदी करण्याचा निर्णय  घेतला आहे. लशीएवजी हर्ड इम्युनिटी आणि मित्र देशांकडून फुकट मिळणाऱ्या लशीवर पाकिस्तान अवलंबून राहणार आहे.

पाकिस्तानच्या सरकारने कोरोनासमोर टेकले हात

नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे सचिव अमिर अशरफ ख्वाजा यांनी लोकलेखा समितीसमोर बोलताना म्हटले की, 'आपण कोणतीही लस खरेदी करणार नाही. हर्ड इम्युनिटी  आणि मित्र देशांक़डून गिफ्ट म्हणून मिळणाऱ्या लशीसोबत कोरोनाची लढाई लढणार आहोत'.  

आपल्याला माहितीच आहे की, हर्ड इम्युनिटी तेव्हा सक्रिय होते.  ज्यावेळी मोठ्या संख्येने लोक संक्रमित होतात. त्यानंतर एकत्रित रोगप्रतिकारक शक्ती लोकांमध्ये तयार होते.

एका चीनी डोसची किंमत 13 डॉलर रुपये

WION या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाच्या एका रिपोर्टनुसार नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या  कार्यकारी निर्देशक मे.जन. अमिर इकराम यांनी सांगितले आहे की, चीन निर्मित कोरोनाप्रतिबंधक लशीच्या एका डोसची किंमत 13 डॉलर आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानने ही लस न विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

चीन लशीच्या भरोसे पाकिस्तान

आर्थिक चणचणीमुळे पैसे देऊन लस खरेदी करण्याचे नियोजन नसल्यामुळे पाकिस्तान हर्ड इम्युनिटीवर अवलंबून आहे. सुत्रांच्या माहितीनुसार चीनने पाकिस्तानला 10 लाख डोस देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पाकिस्ताने आतापर्यंत चीन लशीचे 2 लाख 75 हजार डोस आरोग्यसेवकांना दिले आहेत.

पाकिस्तानचे भारताकडे डोळे

पाकिस्तानला Global Alliance for Vaccines and Immunisation-Gavi कडून भारत निर्मित ऑक्सफर्डची एस्‍ट्राजेनेकाचे 1 कोटी 60 लाख मोफत लशी मिळू शकतात. ज्यातून पाकिस्तानच्या 20 टक्के जनतेचे लशीकरण होऊ शकते.