Groom Bride Viral Video : लग्न आणि वधू वराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. मानपान असो किंवा जेवण्याच्या मेन्यूवरुन अनेक वेळा वऱ्हाडांमध्ये राडा झाल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. वधू वराचे खास क्षणाचे, डान्स, विधी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. वधू वराचेही अनेक वाद लग्नाच्या दिवशी होतात. नुकताच एका लग्नात नवरदेवाने वधूच्या अफेयरचं गुपित सगळ्यांसमोर उघड केलं. या घटनेही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
आता अजून एका लग्न मंडपातील नवरदेवाचं लज्जास्पद कृत्य पाहून नेटकरी संतापले आहेत. लग्नामध्ये लग्नविधी सोबतच अनेक खेळ खेळले जातात. लग्नातील वधू वरामधील खेळ हा गंमतीचा भाग असतो. पण यात खेळाला हिंसक वळण लागलं तर. खरं तर जगात स्पर्धेत आणि खेळामध्ये प्रत्येकाला वाटतं आपण जिंकावं. अनेकांना पराभव सहन होतं नाही. (marriage groom slapped bride at reception as he lost game video viral on social media trending now)
लग्नातील खेळ हे गंमतीचा भाग असतो. नवरदेव आणि नवरीमधील नाते घट्ट करण्याचा एक प्रयत्न असतो. या व्हिडीओमध्ये स्टेजवर नवरदेव नवरी एक गेम खेळत आहेत. त्यांचासोबत एक तरुणी आणि तरुण उभा आहे. खेळ रंगत असताना चतुराईने नवरी मुलगी खेळ जिंकते आणि नवरदेव हरतो. नवरदेवाला ही हार एवढी जिव्हारी लागते की, तो नवरीवर भरमंडपात सर्वांसमोर कानाखाली मारतो. नवरदेवाच्या या कृत्यानंतर वऱ्हाडी शॉकमध्ये जातात. नवरी मुलीलाही काही कळतं नाही. तिला नवदेवाने इतक्या जोरदार मुक्का मारला की, त्याचे दागिनीनेही तुटले.
काही क्षणानंतर स्टेजवर एक महिला येते आणि नवरीला खाली घेऊन जाते. नवरदेवाच्या या कृत्यानंतर नेटकरी हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. नवरदेवाची अशाप्रकारे मारहाण धक्कादायक असून त्याला शिक्षा मिळाली पाहिजे असं अनेक यूजर्सचं म्हणं आहे.
In Uzbekistan, groom hit the bride right at the wedding in front if guests, relatives, families from both sides. Noone stopped him, noone to defend her.
Footage shows the couple participated in game, after which he hit her.
We need an @WomanTreaty urgently pic.twitter.com/rgjtc4qM2W— Leila Nazgul Seiitbek(@l_seiitbek) June 12, 2022
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटवरील @l_seiitbek या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. कुठल्याही महिलेसोबत अशा प्रकारचं हिंसाचार कृत्य हे योग्य नसून हा एक गुन्हा आहे.