भारतातील न्यायाधीश निष्पक्ष नाहीत : विजय मल्या

मनी लॉन्ड्रींग, फसवणूक आणि कर्जबुडवल्या प्रकरणी आरोपी असलेला आणि सध्या विदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्याने चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार केला आहे. विजय मल्ल्या म्हणतो की, भारतातील न्यायाधीश हे निष्पक्ष नाहीत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 12, 2017, 03:02 PM IST
भारतातील न्यायाधीश निष्पक्ष नाहीत : विजय मल्या title=

लंडन : मनी लॉन्ड्रींग, फसवणूक आणि कर्जबुडवल्या प्रकरणी आरोपी असलेला आणि सध्या विदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्याने चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार केला आहे. विजय मल्ल्या म्हणतो की, भारतातील न्यायाधीश हे निष्पक्ष नाहीत.

मल्याविरोधात लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावनी सुरू 

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सोमवारी पुन्हा एकदा सुनावनी सुरू झाली. सुनावनी दरम्यान, विजय मल्ल्याच्या वकिलाने भारतीय न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 61 वर्षीय मल्याबाबत लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावनी सुरू आहे. मल्याचे वकील क्लेयर मोटागोमरी यांनी सुनावनीवेळी सांगितले की, क्रेंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपला निर्णयावर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी डॉ.य मार्टिन लाऊला सादर करण्यात आले. डॉ. लाऊ हे दक्षिण एशियाई प्रकरणांचे अभ्यासक आहेत. डॉ. लाऊ यांनी सिंगापूर आणि हॉंगकॉंग येथील तीन अॅकेडमीतील अभ्यासाचा हवाला देत निवृत्तीला आलेल्या न्यायाधिशांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले.  

'भारतातील सर्व कारागृहं खराब'

 दरम्यान, मल्ल्याने यापूर्वीही भारतावर अनेक आरोप लावले आहेत. भारतात माझ्या जीवाला धोका आहे, असा आरोप करण्यापूर्वी त्याने भारतातील सर्व कारागृहं खराब असल्याचेही म्हटले होते. दरम्यान भारताने यूके ऑथॉरिटीजला विश्वास दिला आहे की, मल्ल्याला मुंबईतील ऑर्थर रोडवरील कारागृहात ठेवण्यात येईल. तसेच, मल्ल्याला कारागृहातील ज्या बरॅकमध्ये ठेवले जाईल, त्या बरॅकीची छायाचित्रेही भारताने यूके ऑथॉरिटीजला पाठवली असल्याचे समजते.

सुनावनीच्या तारखाही ठरल्या

मल्याचा दावा खोटा ठरविण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणी सुनावनी 4, 5, 6, 7, 11 या तारखेला सुनावनी झाली आहे. तर, 12, 13 आणि 14 डिसेंबरलाही पुढील सुनावनी होणार आहे.

विजय मल्ल्यावर काय आहे आरोप?

विजय मल्ल्यावर देशातील अनेक सरकारी बॅंकांचे सुमारे 9000 कोटी रूपायंचे कर्ज थकवल्याचा आरोप आहे. या आरोपावरूनच मल्ल्यावर विश्वासघात आणि फसवणूकीबाबत खटला सुरू आहे. मल्ल्याने 2 मार्च 2016ला भारतातून पलायन केले. तेव्हापासून तो इंग्लंडमध्ये राहात आहे.