माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोदींची ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा

विजय मल्ल्याभोवती कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे. कारण विजय मल्ल्याप्रकरणी मोदींनी थेट ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतलीये.

Updated: Jul 9, 2017, 05:21 PM IST
माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोदींची ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा title=

हॅम्बर्ग : विजय मल्ल्याभोवती कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे. कारण विजय मल्ल्याप्रकरणी मोदींनी थेट ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतलीये. जर्मनीतल्या हॅम्बर्गमध्ये जी-20 देशांच्या परिषदेनिमित्त दोन्ही नेत्यांची भेट झाली.

याभेटीत भारतात आर्थिक गुन्हे करून लंडनमध्ये लपलेल्या गुन्हेगारांचं प्रत्यार्पण करण्यासंदर्भात मोदी आणि थेरेसा यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यामुळे आता मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

विजय मल्ल्या आयडीबीआय, स्टेट बँक यांसारख्या बँकांकडून 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पळाला. त्याच्यावर खटलाही सुरू आहे, मात्र आता याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट थेरेसा यांनाच मदतीचं आवाहन केलंय त्यामुळे मल्याच्या प्रत्यार्पणाच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.