न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात २०२०चे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत

न्यूझीलंडमध्ये नव्या वर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले आहे.  

Updated: Dec 31, 2019, 10:47 PM IST
न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात २०२०चे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत title=

मुंबई : न्यूझीलंडमध्ये (New Zealand) नव्या वर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले आहे. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये नागरिकांनी नववर्ष स्वागताला गर्दी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनीमध्येही नवीन वर्षाचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने २०२० ला (New Year 2020) वेलकम (Welcome) करण्यात आले आहे. 

नववर्षाच्या स्वागतासाठी गूगलचे खास डूडल

ऑकलँड शहरात स्काय टॉवरचे दृष्य यावेळी डोळ्याचे पारणे फेडणारे होते. नागरिक मोठ्या प्रमाणात नववर्षाचे स्वागत करत होते. तर न्यूझीलंडमध्ये भारतीय वेळप्रमाणे ७.३० तास आधी म्हणजे संध्याकाळी ४.३० वाजता न्यूझीलंडमध्ये ऑकलँडमध्ये नववर्षाला सुरुवात झाली. येथे जोरदार फटाके फोडण्यात आलेत.

जगातील काही भागात नवीन वर्षाच्या स्वागातासाठीचा उत्सव आधीच सुरू झाला आहे. २०२० च्या पहिल्या स्वागतार्ह ठिकाण किरिबातीचे छोटे पॅसिफिक बेट, सामोआच्या शेजारमधील भाग आणि  आयलँड्सचा समावेश आहे. नवीन दशकातचे स्वागत करणारे शहर न्यूझीलंडमधील ऑकलंड हे मोठे शहर आहे. ज्यांनी शहरातील स्काय टॉवरवर फटाक्यांच्या प्रदर्शनात २०२० चे स्वागत केले.

ऑस्ट्रेलियात सिडनी हार्बरमध्ये पारंपारिक फटाके फोडून नव वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले.