OMG! हा तर चक्क स्पायडरमॅन सरडा... फोटो पाहाल तर चकीत व्हाल

सरडा की खरा 'स्पायडरमॅन'? फोटो पाहून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

Updated: Dec 25, 2021, 06:20 PM IST
OMG! हा तर चक्क स्पायडरमॅन सरडा... फोटो पाहाल तर चकीत व्हाल title=

आफ्रिका :  तुम्ही आतापर्यंत स्पायडरमॅनचे कार्टुन पाहिले असेल किंवा त्याचा ड्रेस घालून तयार करण्यात आलेले व्हिडीओ पाहिले असतील. पण जर सरड्याचाच रंग स्पायडरमॅन सारखा असेल तर? वाचून थोडं विचित्र वाटलं ना? पण प्रत्यक्षात असा सरडा सापडला आहे.

या सरड्याला पाहिल्यानंतर हाच प्रश्न पडला आहे. हा खरा स्पायडरमॅन की सरडा. या सरड्याचा रंग स्पायडरमॅनसारखा आहे. या सरड्याचा लूक स्पायरडमॅनच्या लूकलाही मागे टाकेल असा आहे. सोशल मीडियावर या सरड्याचा फोटो सध्या तुफान चर्चेत आहे.

निवृत्त जीवशास्त्र शिक्षिका जेनिफर गोल्ड सुट्टी घालवण्यासाठी आफ्रिकेत गेल्या होत्या. फिरताना त्यांना हा आगळा वेगळा सरडा दिसला. या सरड्याचा रंग लाल आणि नाळा होता. यापूर्वी लोकांनी अशाप्रकारचा सरडा कधी पाहिला नव्हता. 

महिलेनं कॅमेऱ्यात या सरड्याचे फोटो काढले. सुपर हिरो स्पायडरमॅन असं काही युझर्सनी म्हटलं आहे. याचा रंग स्पायडरमॅनच्या कपड्यांसारखा असल्याची चर्चा आहे. या सरड्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.