पाकिस्तानने अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिमला ताब्यात द्यावे, भारताची मागणी

 भारताने पुन्हा एकादा पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी दबाव वाढविला आहे. भारताला हवा असलेला कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. 

Updated: Mar 16, 2019, 07:18 PM IST
पाकिस्तानने अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिमला ताब्यात द्यावे, भारताची मागणी title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : भारताने पुन्हा एकादा पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी दबाव वाढविला आहे. भारताला हवा असलेला कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. खरचं तुम्हाला दहशतवाद संपवायचा असेल तर दहशतवाद्यांवर कारवाई करा. तसेच दाऊद इब्राहिम, हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन यासारख्या भारतीय नागरिक असलेल्या आणि पाकिस्तानमध्ये आश्रय घतलेल्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यायला हवे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानमधील बालाकोट येथील त्यांच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानने मोठा कांगावा केला. आमच्याकडे पुरावे दिले तर आम्ही कारवाई करु, असे पाकिस्तानने सांगितले होते. त्यानंतर भारताने पुरावे देऊनही पाकिस्तानकडून केवळ दिखाऊपणा सुरू आहे. यावरच भारताने बोट ठेवत पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. 

भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, पलिकडील देशातून अर्थात पाकिस्तानमधून दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानने असं काहीही होत नसल्याचे सांगत हात झटकले आहे आहे. पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार हा पाकिस्तानातच जाहीर फिरत आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर दहशवादी संघटनांवर पाकिस्तानी बंदी घातली. जर दहशतवादी नाहीत तर पाकिस्तानच्या आश्रयाला का, असा सवाल उपस्थित कऱण्यात येत आहे. दाऊद, सलाऊद्दीन आणि आणखीही काही भारतीय नागरिक असलेले दहशतवादी पाकिस्तानमध्ये वास्तव्याला असून त्यांना तत्काळ भारताच्या हवाली करायला हवे, असे भारताच्यावतीने पाकिस्तानला सांगण्यात आले आहे.