पाकिस्तानी नागरिक जेव्हा 'गलती से मिस्टेक' करतात!

इमराननं व्यक्त होण्याचा आणि 'मी तो नव्हे' हे सांगण्याचा प्रयत्नही केला

Updated: Aug 8, 2018, 05:38 PM IST
पाकिस्तानी नागरिक जेव्हा 'गलती से मिस्टेक' करतात!

मुंबई : पाकिस्तानात इमरान खान पर्व सुरु झालंय. पण, पाकिस्तानी नागरिक मात्र अजूनही पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यासाठी सज्ज झालेल्या इमरान खान आणि भारताचा अभिनेता इमरान खान यांच्यात गोंधळलेले दिसत आहेत. 

'पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ' पक्षाचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये इमरान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक १०९ जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानी निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे नागरिक शुभेच्छा देण्यासाठी तसंच आपल्या समस्या मांडण्यासाठी इमरान खान यांच्याशी सोशल मीडियावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, सोशल मीडियावर मात्र ते पाकिस्तानच्या इमरान खान यांना नाही तर भारताच्या इमरान खानला टॅग करत आहेत. 

'जाने तू या जाने ना' या सिनेमात झळकलेला अभिनेता आणि आमिर खानचा भाचा असलेल्या इमरानला मात्र यावर काय म्हणावं हेच कळेना... त्यामुळे, त्यानं व्यक्त होण्याचा आणि 'मी तो नव्हे' हे सांगण्याचा प्रयत्नही केलाय. आणि त्याला हे आता चांगल्याच पद्धतीनं जमायला लागलंय, असं म्हणायला हरकत नाही
 

Umm... Thanks, I guess?

A post shared by Imran Khan (@imrankhan) on