'इम्रान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात'

पाकिस्तानातील राजकीय पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय)चे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानवर त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्यानं गंभीर आरोप केलाय. इम्रान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात, असे सांगून राजकीय भूकंप केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 2, 2017, 11:43 AM IST
'इम्रान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात' title=

इस्लामाबाद : पाकिस्तानातील राजकीय पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय)चे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानवर त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्यानं गंभीर आरोप केलाय. इम्रान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात, असे सांगून राजकीय भूकंप केलाय.

इम्रान खान आरोप करणाऱ्या महिला या त्यांच्यात  पक्षातील आहे. आयेशा गुलालई, असे त्यांचे नाव आहे. . आरोपांनंतर गुलालई यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिलाय. 

मला माझा प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. तसेच जेथे सन्मान आणि अब्रूचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी मी कोणतीही तडजोड करु शकत नाही, असे पक्षाला सोडचिठ्ठी देताना आयेशा यांनी दिलेय.  गुलालई यांनी पत्रकार परिषद घेऊन खान यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

इम्रान खान हे पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख आहेत. ते पक्षातील इतर महिला नेत्यांचाही छळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, पक्षाने त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान तेहरीक-ए-इन्साफचे नेते शिरीन मजारी यांनी आयेशा यांचे आरोप फेटाळून लावलेत. त्यांना तिकीट दिले नाही म्हणून त्यांनी आरोप केलेत, असे पक्षाने म्हटलेय.