Parents Rape Daughter: अमेरिकेतील उथा येथे एक भयानक घटना घडली आहे. येथील एका वैवाहिक जोडप्याला अटक करण्यात आली आहे. या जोडप्याच्या 15 वर्षीय मुलीने दोन्ही पालक आपला लैंगिक छळ करत असल्याचा आरोप केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या मुलीचे आई आणि वडील मागील वर्षभरापासून तिचा छळ करत आहेत.
पीडित मुलीची आई आणि सावत्र वडील हे वयाच्या तिशीत आहेत. या दोन्ही पालकांविरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बळबरीने लैंगिक अत्याचार, बलात्काराचा प्रयत्न, बलात्कार केल्याच्या गुन्ह्याखाली सावत्र वडिलांना अटक करण्यात आली आहे. तर या मुलीच्या आईविरोधातही याच कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सावत्र वडिलांनी 'या मुलीच्या जन्मापासूनच मी तिचे संगोपन केलं आहे,' अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपांची नावं जाहीर केलेली नाही. पीडितेची ओळख पटू नये म्हणून आरोपींच्या नावांचा खुलासा करण्यात आलेला नाही.
'एबीसी फोर'ने दिलेल्या वृत्तानुसार, वर्षभरापूर्वी अशाप्रकारे लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली. आपल्या मुलीच्या स्नॅपचॅटवर ती अनोळखी व्यक्तींबरोबर 'लैंगिक परिस्थिती'संदर्भात चर्चा करत असल्याचं तिच्या पालकांच्या लक्षात आलं. त्यानंतरपासूनच या मुलीचा छळ या दोघांनी सुरु केला.
तपासमध्ये दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही तिला (पीडितेला) सेक्ससंदर्भात शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलीबरोबर इतर अनोखळी व्यक्तीने लैंगिक संबंध ठेवण्यापेक्षा आपणच संबंध ठेवणं अधिक सुरक्षित ठरेल असं आम्हाला वाटलं," असं सांगितलं. केयूटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार मुलगी 14 वर्षांची असताना या दोघांनी तिच्याशी चर्चा करुन "आपण एकत्र लैंगिक संबंधांचा अनुभव घेऊयात," असं सांगितलं.
वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आम्ही दोघांनी तिला सेक्स टॉईज कशी वापरतात हे प्रत्यक्षात दाखवलं. तिच्याबरोबर आम्ही सेक्स टॉइज वापरुन संबंध ठेवले. मी आणि माझी मुलगी अनेकदा एकत्र आंघोळ करायचो, असंही आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सांगितलं आहे.
पीडितेच्या आईनेही गुन्हा कबुल करताना लैंगिक शिक्षण देताना अनेकदा आम्हा तिघांचाही लैंगिक क्रियेमध्ये समावेश असल्याचे प्रसंग घडल्याचं सांगितलं. मात्र त्याचवेळी या महिलेने आम्ही दोघे एकमेकांबरोबर तिच्या समोर लैंगिक संबंध ठेवत होतो. आम्ही कधीच तिच्याबरोबर प्रत्यक्षात लैंगिक संबंध ठेवले नाहीत. तसेच या महिलेने आपण पतीला मुलीबरोबर पूर्ण संभोग करण्यापासून रोखल्याचाही दावा केला. कंडोम फाटलेला असल्याचं मुलीने निदर्शनास आणून दिल्याने आपण याला विरोध केला होता असं या महिलेने सांगितलं. सुरुवातीला आरोपी वडिलांनी मुलीबरोबर प्रत्यक्षात लैंगिक संबंध ठेवले नाहीत असं सांगितलं होतं. मात्र नंतर आपण आपल्या सावत्र मुलीबरोबर लैंगिक संबंध ठेवले होते अशी कबुली आरोपीने दिली.
पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांना जामीन देण्यात आलेला नाही. पीडितेच्या जीवाला या दोघांपासून धोका असू शकतो म्हणून त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे.