close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

PHOTO : अमेरिकेतल्या कॉन्सर्टमध्ये दिसला 'मिसेस सीएम'चा 'रॉकस्टार' अवतार!

'अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन' यांनी या शोचं आयोजन केलं होतं

Updated: Jun 8, 2019, 09:00 AM IST
PHOTO : अमेरिकेतल्या कॉन्सर्टमध्ये दिसला 'मिसेस सीएम'चा 'रॉकस्टार' अवतार!

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि स्वत: व्यवसायानं बँकर - गायिका असलेल्या अमृता फडणवीस यांच्या लॉस एन्जेलिस आणि कॅलिफोर्नियातील म्युझिकल कॉन्सर्टला तुफान प्रतिसाद मिळतोय. अमृता फडणवीस लॉस एन्जेलिसमध्ये एका कॉन्सर्टसाठी गेल्या आहेत. सोशल मीडियावर अमृता फडणवीस या बऱ्याचदा ऍक्टिव्ह असतात. आपल्या या कार्यक्रमाचा आनंद त्यांनी फोटोसहीत आपल्या फॅन्ससोबत शेअर केलाय. 


अमृता फडणवीस

'जय हो' असं या चॅरिटी म्युझिकल शोचं नाव असून रसिकांची चांगलीच दाद मिळत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरुन सांगितलं.


अमृता फडणवीस

'अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन' यांनी या शोचं आयोजन केलं होतं.


अमृता फडणवीस

 

हृदयविकार, ल्युकेमिया आणि संदर्भातले आजार असलेल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या रूग्णांच्या मदतीसाठी हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला होता.


अमृता फडणवीस

 

या शोमध्ये अमृता फडणवीस यांचा सहभाग होता. आपल्याला या शोमध्ये सहभागी होऊन खूपच आनंद झाला अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलीय. तसेच या कार्यक्रमातले फोटोही पोस्ट केलेत.