विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विमानात एकूण 271 प्रवासी होते. हे विमान मियामी ते चिले असा प्रवास करत असतानाच बाथरुममध्ये खाली कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ही घटना घडली असून, यानंतर विमानाचं तात्काळ पनामा स्थानकावर लँडिंग करण्यात आलं. सह वैमानिकाने विमानाचं लँडिंग केलं असं वृत्त Independent ने दिलं आहे.
LATAM एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर कॅप्टन Ivan Andaur यांना बरं वाट नव्हतं. उड्डाण केल्यानंतर तीन तासांनी त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर विमानातील क्रूने त्यांच्यावर उपचार केले. पण त्या उचपारांचा काही फायदा झाला नाही असं Independent ने म्हटलं आहे.
पनामा विमानतळावर विमानाने लँडिंग केल्यानंतर डॉक्टरांनी वैमानिकाची प्रकृती तपासण्यासाठी डॉक्टरांनी धाव घेतली. पण तोपर्यंत वैमानिकाचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं. Ivan Andaur यांच्याकडे वैमानिक म्हणून तब्बल 25 वर्षांचा अनुभव होता.
"LATAM एअरलाइन्स ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, काल LA505 विमान जे मियामी-सॅंटियागो मार्गावर होते, कमांड क्रूच्या तीन सदस्यांपैकी एकाची तब्येत बिघडल्याने पनामाच्या टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लाँडिग करावं लागलं. विमान उतरले तेव्हा, आपातकालीन सेवांनी मदत देत जीव वाचवण्याचा प्रयतन केला. परंतु पायलटचे दुर्दैवाने निधन झाले," असं एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.
"जे घडले त्यामुळे आम्हाला फार दु:ख झाले असून, आमच्या कर्मचार्याच्या कुटुंबाप्रती आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत, जे त्यांच्या समर्पण, व्यावसायिकता आणि समर्पणाने नेहमीच वेगळे होते. उड्डाणानंतर त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉल पार पाडले गेले," असे पुढे म्हटले आहे. मंगळवारी विमानाने पनामा शहर सोडलं आणि चिलेच्या दिशेने आपला पुढील प्रवास केला.