Plastic Clip Accident: महिला केस बांधण्यासाठी क्लिप किंवा क्लचचा वापर करतात. मात्र, याच क्लिपमुळं एका तरुणीवर भयानक प्रसंग ओढावला होता. या तरुणीने सोशल मीडियावर तिचा अनुभव मांडला आहे. एका क्लिपमुळं ती थेट रुग्णालयात पोहोचली आहे. तिने मांडलेल्या अनुभवाद्वारे तिने क्लिप वापरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
अनेकजणी मोठ्या हौशीने क्लिपचा वापर करतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे आणि महिल्यांच्या सोयीनुसार क्लिप तयार केले जातात. हल्ली प्लास्टिक, काचे, लोखंडाचे असे वेगवेगळे क्लिप बाजारात येत आहेत. मात्र याच क्लिपमुळं एका तरुणीचा भीषण अपघात झाला आहे. संबंधित तरुणीचा भीषण अपघात झाला होता. पण त्यातून ती सुखरुप वाचली होती. परंतु केसांना लावलेल्या प्लास्टिकच्या क्लिपमुळं तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस टाके पडले आहेत.
तरुणीने तिच्या अपघाताचा प्रसंग सोशल मीडियावर मांडला आहे. कार चालवत असताना तिचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तिच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिच्या कारमधील एअरबॅग्स उघडल्या असल्याने मोठी दुर्घटना टळली. एअरबॅग्स उघडल्याने तिच्या डोक्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. पण तिच्या केसांना लावलेल्या प्लास्टिकचा क्लिप तिच्या डोक्याच्या मागील बाजूस घुसला, त्यामुळं तिला गंभीर दुखापत झाली.
क्लिप डोक्याच्या मागील बाजूस घुसल्याने रक्ताची धार वाहू लागली आणि ती बेशुद्ध पडली. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर योग्य उपचार झाल्यानंतर ती शुद्धीवर आली तेव्हा तिला तिच्यासोबत काय घडलं होतं हे समजलं.
एका छोट्याश्या क्लिपमुळं तिच्यावर इतका मोठा प्रसंग घडला हे ऐकून तीला धक्काच बसला. एक क्लिप जीवावर बेतू शकतो हे समजल्यावर तिने लोकांना जागरुक करण्यसाठी सोशल मीडियावर हा अनुभव मांडला होता. तसंच, क्लिपऐवजी रबर बँड वापरावा, असं अवाहनदेखील त्याने केले आहे. तसंच, या अपघातातून बचावल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले आहेत. curlyhair.coo नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, व्हिडिओत महिला गंभीररित्या जखमी झालेली दिसत आहे. तर, तिच्या हातात प्लास्टिकचा क्लिपही दिसत आहे. इतकंच नव्हे तर, हा क्लिप तुटलाही नव्हता तरीदेखील महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.