दोहा : कतारचा हा निर्णय आखातातल्या बदलत्या अर्थकारणाची नांदी ठरू शकतो.

कतारचं उदारीकरण

गेल्या काही महिन्यांपासून आखातातल्या घडामोडींमध्ये चर्चेच्या ठरलेल्या कतारने आखातातल्या अर्थकारणाला नवीन वळण लागू शकेल, एक धाडसी निर्णय घेतला आहे. यापुढे परदेशी गुंतवणुकदारांना कतारमधल्या व्यवसायांमध्ये गुंतवणुक केल्यानंतर पूर्ण मालकी ठेवता येणार आहे. यापूर्वी परदेशी गुंतवणुकदारांना फक्त ४९ टक्केच मालकी ठेवता यायची. उर्वरीत मालकी कतारची असायची.

राजकीय कोंडी

गेल्या काही महिन्यांपासून कतारसाठी आखातातली परिस्थिती प्रतिकूल होत चालली आहे. सौदी अरेबिया, यूएई, बहारीन, इजिप्त या देशांनी कतारवर बहिष्कार घातला आहे. ईराणमधल्या कट्टरपंथीयांशी संधान बांधल्याच्या आरोपातून कतारला वेगळं पाडण्यात आलंय. 

बदलतं आर्थिक धोरण

कतार ही आखातातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. कतार जगातला सर्वात मोठा द्रवस्वरूपातील नैसर्गिक वायूचा पुरवठदार आहे. आपल्या राजकीय आणि आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी कतारने परदेशी गुंतवणुकदारांना सोयी देऊ केल्या आहेत. परदेशी गुंतवणुकदारांना त्यांनी उभा केलेल्या किंवा गुंतवणुक केलेल्या व्यवसायाची मालकी स्वत:कडे ठेवता येईल. फक्त त्यांना स्थावर मालमत्तेत गुंतवणुक करता येणार नाही किंवा स्थावर मालमत्ता स्वत:च्या नावावर करता येणार नाही.

आखाताची भावी दिशा

आखाती देशांसाठी हा एक नवा ट्रेंड असून आखातात सर्व व्यवसाय आणि कंपन्यांची मालकी ही सरकार किंवा राजघराण्याची असते. पण तिथली राजकीय परिस्थिती बदलत चाललीय. त्यामुळेच त्यांनाही जागतिक व्यवस्थांचा स्वीकार करावा लागणार आहे. कतारने घेतलेला निर्णय भविष्यातल्या अनेक बदलांची नांदी ठरू शकतो.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Qatar allows full ownership for foreign investors
News Source: 
Home Title: 

कतारचा परदेशी गुंतवणुकदारांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय

 कतारचा परदेशी गुंतवणुकदारांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

गुंतवणुक केल्यानंतर पूर्ण मालकी

सौदी अरेबिया, यूएई, बहारीन, इजिप्त यांचा कतारवर बहिष्कार

सर्वात मोठा द्रवस्वरूपातील नैसर्गिक वायूचा पुरवठदार 

भविष्यातल्या बदलांची नांदी