ही दोस्ती तुटायची नाय ! जगासमोर रशियाने भारताला पुन्हा एकदा दिलं विशेष महत्त्व

अफगाणिस्तानच्या स्थितीवर होणाऱ्या या बैठकीत जगभरातील विविध देश सहभागी होत असतात. रशियाकडून या बैठकीचं आयोजन केलं जातं.

Updated: Nov 17, 2022, 04:16 PM IST
ही दोस्ती तुटायची नाय ! जगासमोर रशियाने भारताला पुन्हा एकदा दिलं विशेष महत्त्व title=

मुंबई : रशियाची राजधानी मॉस्को (Moscow) या ठिकाणी 'मॉस्को फॉर्मेट कंस्लटेशन ऑन अफगानिस्तान' (‘Moscow format consultations on Afghanistan’) बैठक होत आहे. या बैठकीत भारताने (India) देखील सहभाग नोंदवला आहे. बुधवारी झालेल्या या बैठकीत भारताकडून पाकिस्तान-इराण-अफगाणिस्तान डिवीजनचे संयुक्त सचिव जे पी सिंह यांनी सहभाग नोंदवला. या बैठकीला रशिया, कजाकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, उज्बेकिस्तान, चीन, पाकिस्तान, इराण आणि तुर्कमेनिस्तानने देखील सहभाग नोंदवला होता.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Foreign Ministry) या बैठकीत अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती आणि त्याच्यासोबत निपटण्यासाठी मानवीय मदत महत्त्वाची असल्याचं नमूद केलं. या बैठकीत यंदा भारताला विशेष महत्त्व दिलं गेलं. कारण याआधी अफगाणिस्तानबाबत झालेल्या बैठकीत भारताला आमंत्रित केलं जात नव्हतं.

भारताचे परराष्ट्रमंत्री मंत्री एस. जयशंकर यांनी 8 नोव्हेंबर रोजी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबत चर्चा करताना स्पष्ट केले होते की, भारत देखील या बैठकीत सहभागी होईल. एस जयशंकर यांनी म्हटलं की, जगाने हे विसरता कामा नये की, अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती काय आहे. जगातील देश अफगाणिस्तावर जितकं लक्ष द्यायला हवं तितकं लक्ष देत नाहीयेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अफगाणिस्तानमधील विशेष प्रतिनिधि जामिर काबुलोव यांनी मागच्या महिन्यात 'मॉस्को फॉर्मेट कंस्लटेशन ऑन अफगाणिस्तान' या बैठकीची घोषणा केली होती. धार्मिक आणि सांस्कृतिक प्रकरणात दखल न देता आपण प्रयत्न करु की, तालिबानने महिलांना बाहेर काम करण्याची आणि मुलींना शाळेत जाण्यावर बंदी घालू नये.

भारताने जूनमध्ये अफगाणिस्तानला मेडिकल वस्तूंची मदत केली होती. यावेळी भारताच्या प्रतिनिधींना तालिबानच्या नेत्यांची देखील भेट घेतली होती.

अफगाणिस्तानच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी 2017 मध्ये मॉस्को फॉर्मेटची सुरुवात झाली होती. सुरुवातीला फक्त रशिया, चीन, अफगानिस्तान, पाकिस्तान, इराण आणि भारत हे सदस्य देश होते. याचं आयोजन नेहमीच रशियाकडून केलं जातं.