बापरे! महाकाय शार्कनं घेतले ड्रग्ज; पुढे जे काही झालं याचा विचारही तुम्हाला करता येणार नाही...

Sharks Cocaine Ocean: जलचरांचं विश्व नेमकं किती मोठं आहे हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. अशा या अनोख्या विश्वात सध्या नेमकं काय सुरुये माहितीये तुम्हाला?

सायली पाटील | Updated: Sep 23, 2023, 03:46 PM IST
बापरे! महाकाय शार्कनं घेतले ड्रग्ज; पुढे जे काही झालं याचा विचारही तुम्हाला करता येणार नाही... title=
Sharks ate cocaine in Ocean and started attacking surfers world news

Sharks Cocaine Ocean: अंमली पदार्थांची तस्करी हा नवा विषय नाही. जगभरात विविध पद्धतीनी विविध रुपातील अमली पदार्थांची तस्करी केली जाते. किंबहुना अनेक देशांमध्ये अंमली पदार्थविरोधी कायदेही अधिक कठोर करण्यात आले आहेत. असं असूनही जगाच्या कानाकोपऱ्यातून अशा पदार्थांची तस्करी केली जाते. अल्पवयीन मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत आणि मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गालाही ही व्यसनं जडतात ज्यामुळं अनेकांचीच आयुष्यही उध्वस्त झाल्याचं आपण पाहिलं आहेत. पण, कधी तुम्ही एखाद्या माशाला अंमली पदार्थांच्या आहारी गेलेलं पाहिलंय? ही गोष्ट सहजासहजी पचनी पडणार नाही, पण हे खरंय. 

'डेली स्टार'च्या वृत्तानुसार अमेरिकातील फ्लोरिडामध्ये ही घटना घडली आहे. या भागामध्ये सहसा अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या Drugs समुद्रात टाकतात. किंबहुना त्यानंतर ही पाकिटं घेण्यासाठी हे तस्कर पुन्हा या भागात येतात. पण, बऱ्याचदा पोलिसांच्या भीतीनं ते या भागात फेरीही मारणं टाळतात. अशाच काही अंमली पदार्थांच्या पाकिटांचं समुद्राती शार्कनं अनावधानानं सेवन केलं असून, समुद्रात सर्फिंग करणाऱ्या माणसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आणि या प्रकरणानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 

काय म्हणतात तज्ज्ञ? 

मरीन बायोलॉजिस्ट टॉम हिर्ड यांना निरीक्षणातून शार्क माशाच्या एकूण हालचालींबाबतची ही माहिती मिळाली. समुद्राच्या पाण्यात दोन प्रकारचे शार्क विचित्र व्यवहार करत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. शार्क प्रत्यक्षात अंमली पदार्थांचं सेवन करतं का हा प्रश्न त्यांना पडला आणि च्या दृष्टीनं त्यांनी  निरीक्षण करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर टॉम यांनी काही पाकिटं पाण्यात टाकली आणि त्यानंतर शार्कनं लगेचच ही पाकिटं शार्कनं खाल्ली आणि टॉमही हैराण झाले. 

हेसुद्धा वाचा : मुंबईतील St. Xavier’s College ते संयुक्त राष्ट्र; पाकिस्तानला खडसावणाऱ्या पेटल गहलोत आहेत तरी कोण? 

 

तज्ज्ञांनी निरीक्षणासाठी जी पाकिटं समुद्रात टाकली होती त्यामध्ये अंमली पदार्थ नसून माशाचं खाद्य होतं. पण, यातून माशांनी अंमली पदार्थांचं अनावधानानं सेवन केल्यामुळंच ते अधिक आक्रमक झाल्याचा निष्कर्ष लावला गेला.