भारताच्या ३ महत्त्वाच्या व्यक्तींचा पाकिस्तानला कडक शब्दात इशारा

काश्मीरमध्ये आजही दहशतवादी कारवाया सुरूच आहेत.

Updated: Jan 13, 2021, 04:34 PM IST
भारताच्या ३ महत्त्वाच्या व्यक्तींचा पाकिस्तानला कडक शब्दात इशारा

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये आजही दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. त्याशिवाय पाकिस्तानकडून सातत्यानं घुसखोरीचे प्रयत्न सुरूच असतात. त्यामुळेच भारतानं उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण पाकिस्तानला करु द्यावी लागतेय.

१. दहशतवाद मुळापासून उखडून टाकणार-अजित डोवाल 

२. दहशतवाद संपवताना किंतू परंतू नको- एस जयशंकर

३. दहशतवाद्यांना संपवण्याची वेळ आणि जागा आम्ही ठरवू- लष्कर प्रमुख नरवणे

पाकिस्तानच्या सततच्या कुरापती आता सहन केल्या जाणार नाहीत. भारतानं पाकिस्तानला हे ठणकावून सांगितलं आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं धडा घ्यायला हवा होता. पण सुधरेल तो पाकिस्तान कसला..... म्हणूनच भारताला हे वारंवार कानी कपाळी ओरडून सांगावं लागतं.

तिकडे जेएनयूच्या विद्यार्थ्यांशी बोलताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनी देशभक्तीचा मंत्र दिला आहे. देशावर प्रेम करायचं आणि दहशतवादाला मूळापासून उखडून टाकण्याचं आवाहन केलं आहे.

पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घालणं सोडलं नाही, तर घरात घुसून मारु, लष्करप्रमुखांनी थेट इशारा दिला आहे.

येत्य़ा फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानला त्यांनी गेल्या सहा महिन्यात दहशतवाद रोखण्यासाठी काय केलं हे युएनच्या FATF अर्थात (फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स) समोर सांगावं लागणार आहे. त्याआधीच भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बोगस कारवायाचा पर्दाफाश करण्याची मोहीम जागतिक स्तरावर सुरु केली आहे. भारतानं दिलेल्या या ट्रिपल डोसमधून पाकिस्ताननं धडा घेतला तर ठीक नाही तर संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटणार आहे.