बीजिंग : प्रसिद्धी झोधात येण्यासाठी कुणी सेल्फी काढतं, कुणी डान्स करतं, तर कुणी एखादा स्टंट करत सोशल मीडियात अपलोड करतं. पण एका तरुणाला स्टंटबाजी करणं चांगलचं महागात पडलं आहे.
रुफटॉप क्लायंबर वांग याँगनिंग हा इंटरनेटवर प्रसिद्ध लोकप्रिय आहे. मात्र, ६२ मजल्यांच्या इमारतीच्या छतावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
रुफटॉप क्लायंबर वांग याँगनिंग हा टॉवरवर किंवा एखाद्या उंच ठिकाणावर चढून अनेक स्टंट करायचा. त्यासाठी तो प्रसिद्धही होता.
मात्र, ८ नोव्हेंबर रोजी एक विचित्र घटना घडली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या गर्लफ्रेंडने सांगितले की, हा स्टंट केल्यानंतर तो आपल्या संपूर्ण परिवाराला भेटणार होता आणि आमचं लग्न होणार होतं. या स्टंटवरुन त्याला ८० हजार युआन म्हणजेच ७ लाख रुपये मिळणार होते.
६२ मजल्यांच्या इमारतीवर चढून रुफटॉप क्लायंबर वांग याँगनिंग पुलअप करत होता. मात्र, त्याच दरम्यान तो खाली कोसळळा. उंच इमारतीवरून पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होता आहे.