Gurupornuima 2022 : यावर्षी आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा 13 जुलै रोजी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. एकीकडे लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करून आशीर्वाद घेत असताना, या वर्षी रात्री आकाशात विलक्षण नजारा पाहायला मिळणार आहे. यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा दिसणार आहे. या चंद्राला सुपरमून (Supermoon) म्हटले जाते.
जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, तेव्हा तो सुपरमून दिसतो. अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर जगाला एक अनोखा चंद्र दिसणार आहे. या दिवशी चंद्र इतर दिवसांपेक्षा खूप मोठा आणि अधिक प्रकाश देणारा दिसणार आहे.
13 जुलैची रात्र तुमच्यासाठी आश्चर्यकारक दृश्ये घेऊन येणार आहे. या दिवशी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सर्वात कमी असेल. आज रात्री चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर केवळ 357,264 किलोमीटर असेल. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, सुपरमून काही महासागराच्या ठिकाणी वादळ देखील आणू शकतात. सुपरमून 13 जुलैच्या रात्री 12:07 वाजता दिसण्याची शक्यता आहे, तर पुढच्या वर्षी 2023 मध्ये 3 जुलै रोजी तो दिसेल.
सुपरमून म्हणजे काय
सुपरमून म्हणजे या काळात चंद्र त्याच्या आकारापेक्षा मोठा दिसतो. इतकेच नाही तर या रात्री चंद्र प्रत्येक दिवसापेक्षा अधिक तेजस्वी दिसतो. असे घडते कारण या काळात चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर खूपच कमी होते आणि चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो.