Viral Video : भारतातील लोकांना संगीत ऐकू आलं की त्यांचे पाय थिरकायला लागतात असं म्हटलं जातं. मग भारतातील लग्नसोहळा हा डान्सशिवाय कसा संपन्न होणार. लग्न कोणाचं पण असो आणि कधी पण खास डान्ससाठी एक सोहळा असतो. आजकालच्या लग्नात वधू-वरसोबत कुटुंबातील इतर सदस्य पण आपला जलवा दाखवतात. या खास संगीत कार्यक्रमासाठी वधू-वर, नातेवाईक कोरियोग्राफर बोलून डान्स शिकतात आणि मग स्टेवर परफॉर्म करतात. आपण सोशल मीडियावर असे जबरदस्त डान्सचे व्हिडीओ पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅलफॉर्म यूट्यूबवरही शेअर करण्यात आला आहे.
या लग्नसोहळ्यातील संगीताच्या दिवशी होस्ट काही मुलींना स्टेजवर निमंत्रण देतो. यानंतर या मुलींनी जो काही डान्स केला ते पाहून असं वाटलं जसं स्टेजला आग लागली. हा डान्स खरंच बघण्यासारखा आहे. या मुलींचा डान्स पाहून तुम्हालाही नक्कीच नाचावसं वाटेल. हा व्हिडिओ लंडनमधील असून लग्नात मुलींनी बॉलीवूड गाण्यांवर डान्स केला आहे.
मुलींचा हा डान्सचा जलवा पाहून नवरीही डान्स करण्याचा मोह आवरु शकली नाही. तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर नवरीही तिच्या मैत्रिणींसोबत ठुमके लावू लागली. त्यांच्यामधील अप्रतिम तालमेल पाहून सर्वांनात आश्चर्य वाटलं. या परफॉर्मन्सने सोहळ्यातील पाहुण्यांचं मन जिंकलं. परफॉर्मन्सनंतर पाहुण्यांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा डान्स अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. खास करून डान्सप्रेमींना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. तर तुम्ही पण नक्की पाहा हा जबराट डान्स...