Harnaaz Sandhu Miss Universe Trending Video : यंदाचा युनिव्हर्स स्पर्धेत (Miss Universe 2022) मिस युनिव्हर्स 2022 बहुमान अमेरिकेच्या आर बॉने गॅब्रिएल (R'bonney Gabriel) हिला मिळाला. भारताची दिविता राय टॉप 5 पर्यंतही पोहोचू शकली नाही. 71 व्या मिस युनिव्हर्सचा ताज गॅब्रिएलचं नाव कोरलं गेलं. गेल्या वर्षी हा मान भारताची हरनाज संधू हिला मिळाला होता. व्हेनेझुएला, यूएस आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील स्पर्धकांना या टॉप 3 स्पर्धकांच्या यादीत मान मिळालं. पण या सोहळ्याचा वेळी भारताची हरनाज संधू ढसाढसा रडली. या सोहळ्यात हरनाज संधू (Harnaaz Sandhu ) शेवटचा रॅम्प वॉक (Ramp walk Video) करायला गेली आणि तिच्यासोबत असं काही घडलं की, तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
या स्पर्धेतील 84 सुंदरींनी भाग घेतला होता. गॅब्रिएलने यांना मागे टाकत विजेतेपद मिळवलं. मिस युनिव्हर्सच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर गॅब्रिएल हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्सचा मानाचा मुकूट घातला. त्यानंतर मिस युनिव्हर्स म्हणून शेवटचा रॅम्प वॉक करताना हरनाज संधू पडता पडता वाचली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Trending Harnaaz Sandhu trips on stage as she takes her last walk as Miss Universe video viral on Social media)
Hold back tears as @HarnaazKaur takes the stage one last time as Miss Universe! #MISSUNIVERSE pic.twitter.com/L0PrH0rzYw
— Miss Universe (@MissUniverse) January 15, 2023
भारताची हरनाज जेव्हा स्टेजवर आली ती एका राजकुमारीसारखी दिसतं होती. या क्षणी हरनाज खूप भावूक झाली होती. तिच्या डोळ्यातून आनंदश्रू येतं होते. अशातच जेव्हा ती रॅम्प वॉक करायला गेली तिचा तोल गेला पण तिने स्वत: ला खूप छान प्रकारे सावरलं. त्यानंतर तिचा आत्मविश्वास आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही बोलून गेले. जेव्हा हरनाज स्टेजवर रॅम्प वॉक करत होती तेव्हा बॅकग्राऊंडला व्हॉईस ओवरमध्ये असं म्हटलं जातं होतं की, “मी जेव्हा 17 वर्षांची होती, तेव्हा पहिल्यांदा स्टेजवर मानाचा तुरा रोवला आणि त्यानंतर 22 वर्षांची असताना मिस युनिव्हर्सच्या किताबावर नाव कोरलं.” हरनाजचा हा व्हिडीओ Miss Universe या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.