ही आहे जगातली सर्वात सुंदर आणि Hot पोलीस ऑफिसर, फोटो व्हायरल झाल्यावर लोकं म्हणतायत आम्हाला अटक कर

सोशल मीडियामुळे अनेकजण रातोरात स्टार झाले आहेत, सध्या अशाच एका महिला पोलीस ऑफिसरचा फोटो व्हायरल होत असून जगभरात तिच्या सौंदर्याची चर्चा आहे

Updated: Dec 19, 2022, 09:49 AM IST
ही आहे जगातली सर्वात सुंदर आणि Hot पोलीस ऑफिसर, फोटो व्हायरल झाल्यावर लोकं म्हणतायत आम्हाला अटक कर title=

Lady Police Officer : तंत्रज्ञान युगात सध्या सोशल मीडियाचा (Social Media) जमाना आहे. सोशल मीडियावर एखादी गोष्ट आली की ती क्षणाधार्थ जगभरात व्हायरल होते. असे अनेक फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही फोटो/व्हिडिओ विस्मृतीत जातात, तर काही कायमचे मनावर कोरले जातात. इतकंच काय तर सोशल मीडियामुळे अनेकजण रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत. अशीच एक महिला पोलीस ऑफिसर (Lady Police Officer) सध्या जगभरात प्रसिद्ध झाली आहे. तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या सौंदर्य आणि हॉटनेसचीच (Hot) जोरदार चर्चा आहे. 

कोण आहे ती महिला पोलीस ऑफिसर
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या महिला पोलीस ऑफिसरचं नाव आहे किम्बर्ली कवरडिल (Kimberly Coverdil). किम्बर्ली अमेरिकतली असून एरिजोना (Arizona) राज्यातील पोलीस विभागात ती पोलीस ऑफिसर (Police Department Deputy) आहे. किम्बर्ली आपली मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर पोलीस विभागात भरती झाली. पण चर्चा तिच्या सौंदर्याच्याच आहेत. 

लोकांमध्ये अटक करुन घेण्यासाठी चढाओढ
किम्बर्लीने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर काही काळातच हा फोटो जगभरात व्हायरल झाला. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतक्या सुंदर आणि हॉट पोलीस ऑफिसरकडून अटक करुन घेण्यास आम्हाला आवडेल अशा प्रतिक्रिया युजर्स नोंदवतायत. किम्बर्लीचे फोटो पाहून इतक्या सुंदर पॉलीस ऑफिसरने अटक केली तर आनंदच होईल असंही युजर्स म्हणतायत. 

हे ही वाचा : What is Marriage? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक म्हणाले, 'जरा भेटायला ये'

किम्बर्लीबदद्ल माहिती करुन घेण्यास उत्सुक
सोशल मीडियावर किम्बर्लीचे फोटो व्हायरल झाल्यापासून नेटकरी तिच्याबद्दल अजून जाणून घेण्यास उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार किम्बर्ली काही काळापूर्वी कॅलिफोर्नियामध्ये तैनात होती. त्याआधी ती लॉस एंजेलसध्ये शेरीफ विभागात (Los Angeles County Sheriff's Department) पोलीस इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करत होती. पोलीस विभागात काम करण्याचं लहानपणापासून किम्बर्लीचं स्वप्न होतं. यासाठी तीने कठोर मेहनत घेतली.