फुग्यांसोबत माणसाने केली कमाल! Guinness World Record मध्ये नोंदवलं नाव; पाहा Videoपाहा Video

आम्हाला सांगा आतापर्यंत तुम्ही आयुष्यात किती फुगे फुगवले आहेत. मात्र तुमचं कधी यासाठी नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले नसेल ना.

Updated: Aug 23, 2022, 06:58 PM IST
फुग्यांसोबत माणसाने केली कमाल! Guinness World Record मध्ये नोंदवलं नाव; पाहा Videoपाहा Video title=
trending video 10 balloons in 60 seconds with his nose man creates guinness world record viral video on social media

Trending Video: आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही खास गुण असतात. सोशल मीडियावर आपण असे वेगळं काही तरी करणाऱ्या लोकांचे अंचबात पाडणारे अनेक व्हिडीओ पाहत असतो. कोणाचा डान्स चांगला असतो, तर चिमुकल्याचा आवाज अप्रतिम असतो, तर कोणी अनोख काही तरी करतो. असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. 

अगदी सोमवारी आपण एक अनोखी लग्नपत्रिका पाहिली. औषधाच्या पाकिटवर ही लग्न पत्रिका छापली होती. असे अनेक भन्नाट आयडीया आपण सोशल मीडियावर पाहत असतो. असाच एक अवलिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्यक्तीने फुग्यांसोबत जी कमाल केली आहे त्याची थेट Guinness World Recordमध्ये नोंद झाली आहे. (trending video 10 balloons in 60 seconds with his nose man creates guinness world record viral video on social media)

आम्हाला सांगा आतापर्यंत तुम्ही आयुष्यात किती फुगे फुगवले आहेत. मात्र तुमचं कधी यासाठी नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले नसेल ना. पण या व्यक्तीचं टॅलेंट पाहून तुम्ही अवाक व्हाल. डेव्हिड रश  (David Rush)नावाची व्यक्ती चक्क नाकातील हवेने फुगे फुगवले आहेत. 

1 मिनिटात 10 फुगे नाकाने फुगवण्याचा विक्रम

अमेरिकेतील इडाहो येथील रहिवासी असलेल्या डेव्हिड रशने 60 सेकंदात 10 फुगे नाकाने फुगवले आहेत. हा विक्रम यापूर्वी 2016 मध्ये एशेरिटा फर्मनच्या नावावर होता. या व्यक्तीने एका मिनिटात 9 फुगे नाकातून फुगवले होते. डेव्हिडने एशेरिटाचा हा रेकॉर्ड तोडला आहे. बघा डेव्हिडने कशाप्रकारे फुगे फुगवले ते.