Trending Video: बाप-लेकीच्या जोडीने जिंकली लाखो लोकांची मनं, आरशात पाहू करु लागली...

या व्हिडीओमधील मुलीचा क्यूटनेस तुमचं हृदय जिंकेल यात शंका नाही. असा बाप-लेकीचा व्हिडीओ तुम्ही कधी पाहिलाच नसेल.

Updated: Aug 27, 2022, 09:53 PM IST
Trending Video: बाप-लेकीच्या जोडीने जिंकली लाखो लोकांची मनं, आरशात पाहू करु लागली... title=
trending video father daughter dancing seeing in mirror viral video on social media

Trending Video: मुलगी आणि वडिलांचं नातं खूप खास असतं. लेकी झाली की वडील आनंदाने जल्लोष करतात. सोशल मीडियावर बाप-लेकीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तो पाहून तुमचं मन खूष होऊन जाईल. या व्हिडीओमधील मुलीचा क्यूटनेस तुमचं हृदय जिंकेल यात शंका नाही. असा बाप-लेकीचा व्हिडीओ तुम्ही कधी पाहिलाच नसेल. या व्हिडीओमध्ये दोघांचं नातं पाहून मनं प्रसन्न होऊन जातं. (trending video father daughter dancing seeing in mirror viral video on social media )

या छोट्या व्हिडीओमध्ये बाप-लेकीने खूप धमाल केली आहे. दोघेही बाथरूममध्ये अप्रतिम डान्स करताना दिसले. आरशासमोर हे  दोघेही धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. 

लोकांची मने जिंकली

या व्हिडीओमध्‍ये वडिलांच्‍या एक्‍सप्रेशनपेक्षा मुलीच्‍या गोंडस एक्‍सप्रेशनला अधिक लोक पसंत करत आहेत. दोघांचा ताळमेळ अप्रतिम आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''ते आश्चर्यकारक आहेत''. लोक या दोघांचे कौतुक करताना थकत नाही आहे. या व्हिडीओने सोशल मीडिया यूजर्सचे मनोरंजन केले असून अनेक यूजर्सच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी लाइक केला आहे.