5 मुलांच्या आईचा 16 वर्षांनी लहान युवकावर जडला जीव आणि...

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधूव प्रेमाचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे.

Updated: Jun 13, 2021, 12:58 PM IST
5 मुलांच्या आईचा 16 वर्षांनी लहान युवकावर जडला जीव आणि...

कॅलिफोर्निया: प्रेमाला कोणतचं बंधन नसतं, ना वयाचं, ना कोणत्या अटीचं. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधूव प्रेमाचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. 5 मुलांची आई चक्क तिच्यापेक्षा 16 वर्ष वयाने कमी असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. दोनवेळा घटस्फोट झाल्यानंतर ही महिला आता तिच्या प्रियकरासोबत लग्न करणार आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार महिलेचं नाव 39 कोरी असं असून तिचं वय 39 वर्ष आहे. तिच्या प्रियकराचे नाव मेलविन असून त्याचे वय 23 वर्ष आहे. 

कोरी आणि मेलविन एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात. मेलविन म्हणतो की,  कोरीला 5 मुलं आहेत आणि यापूर्वी तिचे दोनवेळा घटस्फोट झाला आहे. याचा मला काही फरक पडत नाही. मेलविन वयाने छोटा असल्यामुळे कोरीने त्याला त्याच्यापेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. पण मेलविनने मात्र कोरीसोबतचं जीवन व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

कोरीने तिसरं लग्न करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. पण मेलविनसोबत 7 वर्ष राहिल्यानंतर तिला जाणीव झाली आहे की, मेलविन एक चांगला पार्टनर होवू शकतो. मेलविन आणि कोरीला दोन मुलं आहेत. पण सोशल मीडिया या दोघांच्या नात्याला ट्रोल केलं जात आहे. दोघांच्या नात्यावर एका युजरने लिहिलं की, 'मी 38 वर्षांची आहे. मी 23 वर्षांच्या नाही तर 35 वर्षांच्या व्यक्तीला देखील डेट करणार नाही. माझी स्वतःची मुलगी 19 वर्षांची आहे. कोणी असं करू शकतं. '

पण कोरी आणि मेलविन यांना कोणाच्याही बोलण्याचा काही फरक पडत नाही. दोघे एकमेकांना गेल्या 7 वर्षांपासून ओळखतात.मेलविन कोरीच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करतो.