भारत आणि अमेरिकेचा पाकिस्तानला दणका

  मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदवर पाकिस्तानचा खोटारडेपणा आता जगासमोर येणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 21, 2018, 05:33 PM IST
भारत आणि अमेरिकेचा पाकिस्तानला दणका title=

नवी दिल्ली :  मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदवर पाकिस्तानचा खोटारडेपणा आता जगासमोर येणार आहे.

पाकिस्तानला दणका

अमेरिकेच्या दबावानंतर आता यूएन सेक्युरिटी काउंसिलची एक स्पेशल टीम पाकिस्तानला जाणार आहे. ही टीम पाकिस्तानच्या त्या दाव्यांची चौकशी करणार आहे. जे त्यांना हाफिजवर कारवाई म्हणून केले होते.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) चे सदस्य २ दिवसासाठी पाकिस्तानला जाणार आहेत. २५ जानेवारीला ते पाकिस्तानात पोहोचणार आहे. 'द डॉन' वृत्तपत्राच्या बातमीनुसार यूएनएससी प्रतिबंध समिती २५ आणि २६ जानेवारीला पाकिस्ताननी केलेल्या सर्व दाव्यांना पडताळून पाहणार आहे.

पाकिस्तानची पोलखोल

दहशतवादी हाफिज सईद आणि त्यांच्याशी संबंधित संघटनावर पूर्णपणे बंदी घालण्यात पाकिस्तान अशस्वी राहिला. यानंतर भारत आणि अमेरिकेने दबावा टाकला आणि आता संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांची एक टीम पाकिस्तानला याबाबत चौकशी करण्यासाठी जाणार आहे.

हाफिज सईदला २००८ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावात दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं. अमेरिकेने जून २०१४ मध्ये लश्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं.