योगा करणं महिलेला पडलं महागात... सरळ दवाखान्यात झाली दाखल

परंतु एका महिलेला मात्र योगा करणं चांगलंच महागात पडलं आहे. 

Updated: Oct 3, 2022, 07:54 PM IST
योगा करणं महिलेला पडलं महागात... सरळ दवाखान्यात झाली दाखल title=

Woman Admitted to Hospital after Doing Yoga:  योगा हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतो. त्यातून आता योगाचं महत्त्वही वाढू लागलं आहे. विशेषतः तरूणांमध्ये योगाची क्रेझ खुपच वाढली आहे. स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांनीही योग करायला सुरुवात केलीये. (viral news women get hospitalized while performing yoga at home)

परंतु एका महिलेला मात्र योगा करणं चांगलंच महागात पडलं आहे. योगा करताना विशेषतः काळजी घेतली पाहिजे परंतु जर ती घेतली नाही तर जराशी चूकही आपल्याला महागात पडू शकते. चीनच्या एका महिलेसोबतही असंच घडलं. 

आपल्या प्रशिक्षकाडून योगा शिकत असताना त्या महिलेचं हाड मोडलं आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचं नाव वांग असून ही घटना चीनच्या अनहाई प्रांतातील आहे. वांग एका खासगी योग शिक्षकाकडे योग शिकण्यासाठी जात होती. तिच्या योगा शिक्षकाने त्याला ड्रॅगन पोज करायला सांगितलं. तिने प्रयत्न केला आणि तिचं त्यात हाडचं मोडलं. 

या महिलेनं सांगितलं की ही पोज करताना तिला प्रचंड पायाला दुखापत झाली आणि तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या हाडात फ्रॅक्चर असल्याचे कळून आले. यावरील उपचारांसाठी वांगचं ऑपरेशन करावं लागलं. 

महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती महिला सुमारे 16 दिवस रुग्णालयात राहिली. या काळात तिला चालणंही शक्य नव्हतं. वांगच्या योग शिक्षकाने हॉस्पिटलचा सर्व खर्च उचलला. त्यांनी उपचारांवर सुमारे चार लाख रुपये खर्च झाला.