वाघांसोबत जगणारा हा 'शेर' नक्की आहे तरी कोण?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत असलेल्या या व्यक्तीला चिता, वाघ , सिंह हे प्राणी पाळण्याचं वेड आहे.

Updated: Jul 21, 2021, 06:56 PM IST
वाघांसोबत जगणारा हा 'शेर' नक्की आहे तरी कोण?

मुंबई : काही लोकांना मांजरींचे लाड करायला आवडतात, तर काहींना कुत्रा पाळण्याला आवडतो. पेट डॉग म्हणून तो आपला मालकाचं ऐकत घराची राखण देखील करत असतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत असलेल्या या व्यक्तीला चिता, वाघ , सिंह हे प्राणी पाळण्याचं वेड आहे. अरब शेख हमीद अबदुल्ला अलबुकैश ( Arab Sheikh Humaid Abdalla AlBuQaish ) असं या व्यक्तीचं नाव आहे.

त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नजर मारली तर त्याचं प्राण्यांसोबत असलेलं नातं तुम्हाला सहजच दिसून येईल. त्याचे हे व्हिडिओ सगळ्यांचच लक्षवेधून घेणारे आहेत. या व्यक्तीची वाघ, सिंह यांसारख्या बलाढ्य प्राण्यांसोबत घट्ट  मैत्री आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Humaid Abdulla Albuqaish (@humaidalbuqaish)

अरब शेख हमीद अबदुल्ला अलबुकैश ( Arab Sheikh Humaid Abdalla AlBuQaish ) हा सतत प्राण्यांसोबत खेळतानाचे व्हिडिओ पोस्ट करताना दिसतो. त्यातील काही व्हिडिओ हे खरं तर अंगावर काटा आणणारे देखील असतात. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की हमीद आणि या प्राण्यांची इतकी घट्ट मैत्री कशी आहे ?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Humaid Abdulla Albuqaish (@humaidalbuqaish)

जंगलात राज्य करणारे प्राणी हमीदसोबत त्यांच्या घरात राहतात. कधी हमीत वाघाला घेऊन वॉकला जातो. तर कधी सिंहासोबत सोप्यावर बसून त्याचे लाड करताना दिसतो.

हमीदच्या अंगा-खांद्यावर खेळताना दिसणारे हे प्राणी त्याला कोणत्याच प्रकारची इजा करत नाहीत. उलट हमीद त्यांना आपल्या जवळ बसवून त्यांच्यातला एक असल्याप्रमाणे वागतो.हमीदचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत असतात.

इंस्टाग्रावर त्याचे 1 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. त्याने व्हिडिओ पोस्ट करताच त्याचे फॉलोवर्स कमेंटचा वर्षाव करताना दिसतात.