विमानात गरम होत असल्यामुळे महिलेने उघडला इमर्जंसी गेट : viral Video

पाहा अफलातून व्हिडिओ

Updated: Sep 3, 2020, 01:08 PM IST
विमानात गरम होत असल्यामुळे महिलेने उघडला इमर्जंसी गेट : viral Video

नवी दिल्ली : जगभरात हटके गोष्टी करणाऱ्या लोकांची काही कमी नाही. हल्लीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला एअरप्लेन विंग्सवर रेंगाळताना दिसत आहे. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण याचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पार्कप्रमाणे फेऱ्या मारतेय महिला   

विमानातून प्रवास करणारे अनेकजण सतर्क असतात. एअरलाइन्सकडून सांगितल्या जाणाऱ्या सगळ्या सुचनांच पालन करतात. मात्र एक विमान लँड होण्या अगोदर एका महिलेना असा काही कारनामा केला ज्यामुळे ती घटना आणि महिला दोघेही चर्चेत आल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by (@boryspilchany) on

तुर्कीच्या अंताल्यावरून सुट्टी संपवून युक्रेन एक महिला परतात होती. जेव्हा विमान यूक्रेनच्या कीवमध्ये लँड झालं. तेव्हा अचानक तिला गरम व्हायल लागला. त्यानंतर महिलेने इमर्जंसी गेट उघडून मोकळ्या हवेचा आनंद घेऊ लागली. अगदी पार्कमध्ये आरामात फिरतात तशी ही महिला अत्यावश्यक दरवाजा उघडून फिरू लागली.