Cricket : मिताली राजशी घेतलेला पंगा रमेश पोवार यांना भोवला

 भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजशी घेतलेला पंगा महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांना चांगलाच भोवलाय. बीसीसीआयकडून रमेश पोवार यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर त्यांची फेरनियुक्ती न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Cricket : मिताली राजशी घेतलेला पंगा रमेश पोवार यांना भोवला
Reuters File Photo of Ramesh Powar.

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजशी घेतलेला पंगा महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांना चांगलाच भोवलाय. बीसीसीआयकडून रमेश पोवार यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर त्यांची फेरनियुक्ती न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पोवार यांचा कार्यकाळ संपताच बीसीसीआयनं महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी नव्यानं अर्ज मागविले आहेत. पोवार यांनी पुन्हा अर्ज केला, तरी त्यावर विचार होणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.

I feel sorry for Mithali Raj: Sunil Gavaskar

माजी कर्णधार मिताली राज हिने रमेश पोवार यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, पोवार यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. त्यामुळे कोण खरे आणि कोण खोटे बोलत आहे, याची चौकशी होणे गरजेचे होते. मात्र, तसे झालेले नाही.