कोलकाता : टीम इंडियाचा धडाकेबाज बॅटमन्स गौतम गंभीर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. गौतमला कन्या रत्नाचा लाभ झाला.
गौतम गंभीरची पत्नी नताशाने एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. गंभीरने त्याच्या मुलीचा फोटो ट्विटरवर शेअर करत ही गोडबातमी दिली.
गौतम गंभीर आणि त्याची पत्नी नताशा यांचा विवाह ऑक्टोबर २०११ मध्ये झाला. गंभीर दाम्पत्याला पहिली मुलगी आहे.
An angel blessing our family,
An angel brightening our lives,
Welcome to the world, little angel! pic.twitter.com/nrJ0hhuX9Y— Gautam Gambhir (@GautamGambhir) June 21, 2017
आमच्या कुटुंबाला परीची साथ आहे, परीमुळे आमचे आयुष्य उजळून निघाले, आमच्या कुटुंबात नवीन परीचे स्वागत आहे, असे गौतमने म्हटलेय. गौतम गंभीरने कन्यारत्न झाल्याची घोषणा करताच ट्विटरवर त्याच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. इरफान पठाणनेही गंभीरचे खास अभिनंदन केलेय.