विराट कोहलीकडून टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत हा फोटो शेअर

मॅचच्या दोन दिवस आधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी विरंगुळा एंटिगाच्या बीचवर मज्जा मस्ती केल्याचं काही फोटोत दिसतंय.

Updated: Aug 21, 2019, 01:54 PM IST
विराट कोहलीकडून टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत हा फोटो शेअर title=

मुंबई : एंटिगामध्ये भारत आणि वेस्टइंडीजमध्ये टेस्ट सीरीजचा पहिला सामना गुरूवारी होणार आहे. आता जगाच्या नंबर एक टेस्ट टीमच्या विरोधात लाल बॉलच्या सामन्यात वेस्टइंडीजला टीम इंडियासमोर उत्कृष्ट खेळ दाखवण्याची आवश्यकता आहे. मॅचच्या दोन दिवस आधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी विरंगुळा एंटिगाच्या बीचवर मज्जा मस्ती केल्याचं काही फोटोत दिसतंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Stunning day at the beach with the boys

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

टीमचे फक्त हेच खेळाडू दिसले
टीमचा कर्णधार विराट कोहलीने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोत टीम इंडियाचे सगळे खेळाडू शर्टलेस दिसत आहेत. फोटोत विराटच्या बाजुला जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा आहे. यात मयंक अग्रवाल, ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, केएल राहुल आणि इतर खेळाडूं सोबत सपोर्ट स्टाफचे काही सदस्य आहेत. या फोटोत जडेजा, अश्विन, शमी, भुवी नव्हते.

विराटची प्रतिक्रिया
विराट कोहलीने इस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत कमेंट केली की, 'मुलांसोबत बीचवर एक सुंदर दिवस' या सेशननंतर टीम इंडिया सामन्याची तयारी करीत आहे.

ही टीम इंडियाची आईसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली टेस्ट सीरीज आहे. विराट म्हणाला की, त्यांचे आता या चॅम्पियनशिपवर विशेष लक्ष आहे. विराटने क्रिकेट वेस्टइंडीजच्या अवॉर्ड फंक्शन नंतर सोमवारी सांगितले की, आता टेस्ट चॅम्पियनशिप झाल्याने टेस्टमॅच रोमांचक झाल्या आहेत. आसीसीने हा एक चांगला निर्णय घेतला. त्यामुळे सगळ्यांना टेस्ट खेळण्याचे कारण मिळेल. 

विराट म्हणाला की, गेल्या दोन वर्षांमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये स्पर्धा दुप्पट झाली आहे, तरी देखील असं म्हणतात की या फॉर्मेंटमध्ये रूची कमी होत आहे. विराट या सीरीजमध्ये अनेक रेकॉर्ड बनवू शकतो. यात त्याची सगळ्यात पहिले नजर टेस्ट क्रिकेटमध्ये ७ हजार रन पूर्ण करण्याकडे आहे. विराटने ७७ टेस्ट सामन्यामध्ये आतापर्यंत ६ हजार ६१३ रन बनवले आहेत आणि त्याच्यासमोर २५ टेस्ट शतकं आहेत.