WIA vs IND, 3-day Practice Match: हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणेचं अर्धशतक, मॅच ड्रॉ

टीम इंडिया आणि वेस्टइंडिज-ए क्रिकेट टीममध्ये तिथल्या कूलिज क्रिकेट ग्राउंडमध्ये ३ दिवसीय अभ्यास कसोटी मॅचचा सोमवारी शेवट झाला. 

Updated: Aug 20, 2019, 04:39 PM IST
WIA vs IND, 3-day Practice Match: हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणेचं अर्धशतक, मॅच ड्रॉ title=

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्टइंडिज-ए क्रिकेट टीममध्ये तिथल्या कूलिज क्रिकेट ग्राउंडमध्ये ३ दिवसीय अभ्यास कसोटी मॅचचा सोमवारी शेवट झाला. टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  चेतेश्वर पुजाराने १०० आणि रोहित शर्माने ६८ रन्सची उत्कृष्ठ खेळी केली. 

पहिल्या डावात पाच विकेटवर २९७ रन केले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ठ प्रदर्शन करत कॅरिबियन टीमला फक्त १८१ रन करू दिले. भारताकडून इशांत शर्मा, उमेश यादव, आणि कुलदीप यादव यांनी तीन -तीन विकेट घेतले. दुसऱ्या दिवस संपेपर्यंत टीम इंडियाने एक विकेट गमवत ५४ रन बनवले, आणि स्कोअर २०० पर्यंत पोहोचला. 

तिसऱ्या दिवशी सोमवारी भारताकडून अजिंक्य रहाणेने ५४ आणि हनुमा विहारीने ६४ रनांचा डाव खेळला. टीम इंडिया ७८ ओव्हरमध्ये ५ विकेटवर १८८ रनांवर खेळ संपवला. वेस्टइंडिज-एकडून अकीम फ्रेजरने २ विकेट घेतले. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात ४७ रन करत ३ विकेट घेतले. भारतीय टीममधून जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी एक-एक विकेट घेतल्या

या मॅचचे महत्व म्हणजे, २२ ऑगस्टला वेस्टइंडीजच्या विरोधात होणाऱ्या टेस्ट मॅच आधी भारतीय फलंदाज आणि गोलंदाजला अभ्यास करण्यासाठी खूप वेळ मिळाला. पुजाराने शतक करत तो फार्ममध्ये असल्याचे दाखवले. भारताला २२ ते २६ ऑगस्टपर्यंत एंटिगामध्ये पहिला टेस्ट सामना खेळावा लागेल. या दोन्ही टीमचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा पहिला सामना असेल.