2018 हे वर्ष घेऊन आले युवांसाठी 2 लाख नोकऱ्या

2018 हे वर्ष नोकऱ्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय खास असणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 1, 2018, 10:12 PM IST
2018 हे वर्ष घेऊन आले युवांसाठी 2 लाख नोकऱ्या title=

मुंबई : 2018 हे वर्ष नोकऱ्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय खास असणार आहे. 

या वर्षात अनेक युवांना चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या वर्षात आयटी क्षेत्रात दोन लाखाहून अधिक नोकऱ्या मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय रोजगार बाजार मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय हे आर्टिफिशिअल इंटेलीजेंसमध्ये आलेल्या मोठ्या बदलाला जात आहे. या बदलामुळे कर्मचारी उत्तम काम करून आपल्या नोकऱ्या वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहेत.

स्वचलनामुळे अनेक नोकऱ्या धोक्यात असल्या तरीही अनेक श्रेणीत नोकऱ्या वाचल्या आहेत. मोबाइल विनिर्माण, वित्तीय टेक्निकल  आणि स्टार्ट अप क्षेत्रात उत्तम सोय असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे मोबाईल, स्टार्टअप सुरू करण्यात अनेकांचा कल दिसत आहे. टीमलीज सर्विसेसच्या आयटी नोकऱ्यांच्या महाप्रबंधक अल्का ढींगरा यांनी सांगितले की, वित्तीय सेवा क्षेत्रात सुधार आणि कारभारात डिजिटलीकरण तसेच स्वचालनमध्ये वाढ होत असल्याची आशा आहे. 

अल्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांकडून करण्यात येणारी नोकर भरती हे एक रोजगार निर्मिती मागचं एक कारण होऊ शकतं. 2018 मध्ये जवळपास 20 टक्क्यांहून अधिक नोकर भरतीची संधी मिळणार आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय सूचना प्रायोगिक उद्योगांमध्ये 2018 या वर्षात 1.8 ते 2 लाखापर्यंत नवीन नोकऱ्यांची उपलब्धता निर्माण होत आहे. भारत हा डिजिटल इंडियाकडे आता वळत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे डिजिटल कौशल्य असलेल्या लोकांना 50 टक्क्यांहून अधिक संधी उपलब्ध आहे. 

2022 पर्यंत भारतात 60 करोडहून अधिक लोकं जोडण्याची शक्यता 

अडोबी इंडियाचे उपाध्यक्ष अब्दुल जलीलने सांगितले की, डिजिटल गोष्टींद्वारे अनेक नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उत्कृष्ठ काम करणाऱ्या लोकांची आता तारेवरची कसरत आहे की त्यांना अधिकाधिक चांगल काम करत राहायचं आहे