खुशखबर : १० वी पास तरुणांना देशसेवेत नोकरीची संधी, इथे करा अर्ज

एकूण ५४ हजार ९५३ जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. 

Updated: Jul 22, 2018, 01:24 PM IST
खुशखबर : १० वी पास तरुणांना देशसेवेत नोकरीची संधी, इथे करा अर्ज

मुंबई : जर तुम्ही दहावी पास आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलीयं. स्टाफ सिलेक्शन कमीशनने एसएससी जीडी परीक्षा २०१८ साठी २१ जुलैला नोटीफिकेशन जारी केलंय. बीएसएफ, सीआईएसएफ, आईटीबीपी, सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आणि राइफलमॅन पदांसाठी जागा रिक्त आहेत. यासाठी एसएससी जीडी परीक्षा घेतली जाणार आहे. २० ऑगस्ट २०१८ पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. एकूण ५४ हजार ९५३ जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

पात्रता

या पदासाठी इच्छूक असणाऱ्या पुरूषांची उंची १७० से.मी तर महिला उमेदवारांची उंची ८० सेमी अपेक्षीत आहे. पुरूष उमेदवार छाती ८० सेमी (फूलवून ८५ सेमी) असणे अपेक्षित आहे.

इथे करा अर्ज 

इच्छूक उमेदवारांना  http://www.ssconline.nic.in  किंवा http://www.ssc.nic.in च्या माध्यमातून अर्ज करता येईल. 
यावर Click here to apply च्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर अर्जासंदर्भातील संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.