पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

पंकजा मुंडेभारतीय जनता पक्ष

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. पंकजा मुंडे यांनी बी.एस.सी. आणि एमबीए केलं आहे. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठस्सा उमटवला. पंकजा या जेष्ठ दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा मुंडे यांचा मार्च १९९९ मध्ये विवाह झाला. पंकजा मुंडे यांना २ छोट्या बहिणी आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत. पंकजा पालवेंचा २००९ मध्ये राजकीय प्रवास सुरु झाला. पंकजा यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा मुंडे या २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वडिलांसाठी पंकजा मुंडे यांनी जवळपास ३०० गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या. आघाडी सरकारने बीडचा दुष्काळी जिल्ह्यात समावेश न केल्यामुळे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. आज पंकजा मुंडे या भाजप सरकारमध्ये ग्रामविकास आणि महिला-बालकल्याण मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेकांनी पसंती देखील दिली होती. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप देखील झाला. पंकजा मुंडे राज्यातील बहुजन समाजाचा चेहरा आहेत.

आणखी बातम्या

माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?

माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?

बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी

Apr 20, 2024, 21:50 PM IST
LokSabha Election 2024 Pankaja Munde Manoj Jarange Controversy

VIDEO| मनोज जरांगेवर टीका केली नाही- पंकजा मुंडे

LokSabha Election 2024 Pankaja Munde Manoj Jarange Controversy

Apr 20, 2024, 16:45 PM IST
'माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

'माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Pankaja Munde believes on victory in Beed LokSabha : माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी पंकजा काय काय म्हणाल्या? पाहा

Apr 18, 2024, 16:58 PM IST
'...म्हणून वर्गणी काढून मला घर बांधून दिल्यास मी मरेपर्यंत..'; जाहीर सभेत पंकजा मुंडेंचं आवाहन

'...म्हणून वर्गणी काढून मला घर बांधून दिल्यास मी मरेपर्यंत..'; जाहीर सभेत पंकजा मुंडेंचं आवाहन

Beed Constituency Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं लोकसभेचं तिकीट कापून त्यांच्या बहिणीला म्हणजेच राज्याच्या माजी महिला

Apr 09, 2024, 10:13 AM IST
पंकजा मुंडेंना मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे! 'एक मराठा, लाख मराठा'ची घोषणाबाजी

पंकजा मुंडेंना मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे! 'एक मराठा, लाख मराठा'ची घोषणाबाजी

Pankaja Munde Shown Black Flags By Maratha: काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या आमदार कन्या आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती

Mar 23, 2024, 14:35 PM IST
पवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'

पवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'

Beed Loksabha : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझ्या विकासाच्या कामांवर माझी

Mar 21, 2024, 16:52 PM IST
मुंडे बहीण-भावाला बीडचा अवघड पेपर! पवारांकडे 2 हुकमी एक्के, मराठा कनेक्शन निर्णायक?

मुंडे बहीण-भावाला बीडचा अवघड पेपर! पवारांकडे 2 हुकमी एक्के, मराठा कनेक्शन निर्णायक?

Loksabha Election 2024 Beed Constituency: बीड मतदारसंघामधून भाजपाने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडेंचं समर्थन त्यांना असलं तरी ही निवडणूक

Mar 20, 2024, 14:57 PM IST
पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढणार विनायक मेटे यांच्या पत्नी, शरद पवार गट देणार पाठिंबा?

पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढणार विनायक मेटे यांच्या पत्नी, शरद पवार गट देणार पाठिंबा?

 Lok Sabha election : संघटनेचे संस्थापक दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ज्योती मेटे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक

Mar 19, 2024, 16:17 PM IST