4,20,00,00,000 च्या संपत्तीचा मालक आता राजकारण गाजवणार; थलपति विजयच्या पक्षाचं नाव पाहिलं?

Thalapathy Vijay Political Party : थलपती विजयची राजकारणात धडाकेबाज एन्ट्री!

दिक्षा पाटील | Updated: Aug 22, 2024, 11:12 AM IST
4,20,00,00,000 च्या संपत्तीचा मालक आता राजकारण गाजवणार; थलपति विजयच्या पक्षाचं नाव पाहिलं? title=
(Photo Credit : Social Media)

Thalapathy Vijay Political Party : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपतीनं आज गुरुवारी त्याचा स्वत: चा राजकीय पक्ष सुरु केला आहे. त्याच्या या राजकीय पक्षाचं नाव तमिलगा वेत्री कझगम (टीवीके) असं आहे आणि यावेळी त्यानं त्याचा झेंडा आणि पक्षाच्या चिन्हाचं अनावरण केलं आहे. ज्यावेळी विजय थलपतीनं त्याच्या पक्षाच्या नावाची आणि चिन्हाचे अनावरण केले तेव्हा त्याचे आई-वडील हे पार्टीच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते. त्याचे आनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

विजयनं सांगितलं की विजयनं सांगितलं की 'तुम्ही सगळे आमच्या पहिल्या राज्य अधिवेशनाची प्रतीक्षा करत होते याची मला कल्पना आहे. त्यासाठी मी तयारी सुरु केली असून लवकरच मी याविषयी देखील घोषणा करणार आहे. त्याआधी आज मी आमच्या पक्षाच्या चिन्हाचे अनावरण केले आहे. मला खूप अभिमान वाटतो की तामिळनाडूच्या विकासासाठी आपण एकत्र काम करू.'

पार्टीच्या चिन्हाचे अनावरण करण्या आधी विजय थलपतीनं राजकारणी होण्याआधी शपथ घेतली. त्यानं म्हटलं की 'आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले आणि ज्यांनी बलिदान दिले त्या सैनिकांचे आम्ही नेहमीच कौतुक करू. तमिळनाडूच्या भूमीतील आपल्या लोकांच्या हक्कांसाठी अथकपणे लढणाऱ्या त्या अगणित सैनिकांचे योगदान आम्ही सदैव लक्षात ठेवू. जात, धर्म, लिंग, जन्मस्थान या नावावरचा भेदभाव मी दूर करेन. मी लोकांमध्ये जागृती निर्माण करेन आणि सर्वांना समान संधी आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. मी शपथ घेतो की मी सगळ्यांसाठी समानतेचे तत्व कायम ठेवीन.'

या आधी बुधवारी तमिळाडूमध्ये झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये विजय थलपतीनं सांगितलं की लोकांसाठी काम करणं हा त्याच्यासाठी असलेला एक खूप मोठा आशीर्वाद आहे. रोज नवी दिशा आणि नव्या ताकदीनं काम करायचे असेल तर हा खूप मोठा आशीर्वाद आहे. 22 ऑगस्ट 2024 हा दिवस आहे जो देव आणि निसर्गानं आपल्याला आशीर्वाद म्हणून दिला आहे. याच दिवशी आमच्या तामिळनाडू विजय क्लबचा झेंडा आणि चिन्ह तुमच्या सगळ्यांसोबत सादर करण्याची संधी मिळाली. 

विजय थलपतीनं राजकारणात प्रवेश केला असून याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याच्या पार्टीच्या नावाच्या घोषणा केली होती. दरम्यान, विजय थलपती हा 4,20,00,00,000 संपत्तीचा मालक आहे.