लग्नाच्या 8 वर्षांनंतर संजीदा शेखसोबत घटस्फोटावर आमिर अलीचं वक्तव्य, म्हणाला 'मी हादरलो...'

अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 25, 2022, 06:33 PM IST
लग्नाच्या 8 वर्षांनंतर संजीदा शेखसोबत घटस्फोटावर आमिर अलीचं वक्तव्य, म्हणाला 'मी हादरलो...' title=

मुंबई : अभिनेता आमिर अली आणि  संजीदा शेख यांची जोडी ही गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत होते. आमिरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान स्वत: आणि संजीदा शेख सोबत विभक्त होण्याविषयी  खुलेपणाने वक्तव्य केले आहे . ऑगस्ट 2020 मध्ये, आमिर आणि संजीदा सरोगसीद्वारे मुलगी आयरा अलीचे आई-वडील झाले आणि काही महिन्यांनंतर, त्यांनी विभक्त होण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आमिरच्या म्हणण्यानुसार, त्याचा लग्नानंतरचा काळ सर्वात कठीण होता.

आमिर म्हणाला, 'एका क्षणी हे खरोखर कठीण होतं. माझं लग्न तुटल्यानंतर मी हादरलो होतो. पण मी स्वभावानं एक खेळाडू आहे आणि मी कधीही हार मानत नाही. मी नेहमी आनंदी व्यक्ती असायचो आणि मी खूप आनंदी आहे. मी परत आलोय.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आमिर पुढे म्हणाला, 'माझ्या मनात कोणासाठी वाईट भावना नाही आणि मी माझ्या एक्ससाठी शुभेच्छा देतो. सर्वानी आयुष्यात आनंदी राहा.' आमिरच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 महामारीनं त्याला स्वतःला समजून घेण्यासाठी खूप वेळ दिला. यामुळे त्याला स्वत:मध्ये सकारात्मक पाहण्यास मदत झाली.' तो म्हणाला, 'साथीच्या आजाराच्या काळात मला माझ्याबद्दल शिकण्यासाठी खूप वेळ मिळाला. मला सकारात्मकता दिसू लागली. मग ते कोविड-19 असो किंवा माझं अयशस्वी नातेसंबंध असो.'

आमिर म्हणाला, 'मी पुढे जायला शिकलो आहे. जर मी आनंदी असेल तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवू शकेन. नाहीतर माझा आयुष्य उध्वस्त होईल.'

आमिरपासून वेगळे झाल्यानंतर संजीदा शेखनं दावा केला होता की, 'तिला 10 महिने तिची मुलगी आयराला भेटू दिलं गेलं नाही.' नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिरनंही संजीदाच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाला, 'मला कोणतंही कार्ड प्ले केलं नाहीत, परंतु दुर्दैवानं नेहमीच एक माणूस दोषी असतो. मी माझ्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बाबींमध्ये नेहमीच आदरपूर्ण मौन पाळले आहे. मी एक अशी व्यक्ती आहे जिनं अनेक वर्षे आदरानं घालवली आहेत.'