वडिलांच्या घटस्फोटानंतर आमिरच्या मुलीची पोस्ट व्हायरल

इरा खान आमिरच्या पहिल्या पत्नीची मुलगी 

Updated: Jul 4, 2021, 02:50 PM IST
वडिलांच्या घटस्फोटानंतर आमिरच्या मुलीची पोस्ट व्हायरल

मुंबई : आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी आपण घटस्फोट घेतल्याची माहिती शनिवारी जाहीर केली. ही धक्कादायक बातमी समोर येताच सगळीकडे जोरदार चर्चा रंगली. अचानक असं काय झालं की, मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरने असं का केलं?

आमिर खान आणि किरण रावने एक माहिती पत्रक जाहिर केलं. यामध्ये आपण विभक्त होत असल्याची माहिती दिली. याच्या अगदी थोड्या वेळातच आमिर खानची मुलगी आइरा खानने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आइरा खान ही आमिर खानच्या पहिल्या पत्नीची रीना दत्ताची मुलगी आहे. आमिर खानच्या (Aamir Khan)मुलीने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. आइरा खान या फोटोत झोपलेली दिसत आहे. आइराने बेडवर झोपून सेल्फी घेतली आहे. या फोटोत तिने निळ्या रंगाचा टॉप घातला आहे. 

आइराला या पोस्टमधून नक्की काय सांगायचंय? नेक्स्ट रिव्ह्यू उद्या.... नेमकं काय घडतंय? यामधून आइराला काय सांगायचंय? यावरून नेटीझन्सने अनेक तर्क वितर्क लावले आहेत. या अगोदरही आमिरच्या मुलीने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. ते पोस्ट तिच्या बॉयफ्रेंडसाठी असल्याचं म्हटलं आहे. (पहिल्या घटस्फोटानंतर आमिरला सलमानने दिला होता 'हा' सल्ला) 

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी आपलं 15 वर्षांचं नातं संपवलं आहे. एक नोट लिहून या दोघांनी आपले रस्ते वेगळे झाल्याचं जाहीर केलं. जवळपास 16 वर्षांच्या नात्यानंतर आमिर खानने पहिली पत्नी रीना दत्तासोबतचं आपलं नातं तोडलं होतं. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. रीनाला घटस्फोट दिल्यानंतर एका मुलाखतीत आमिर खानने या काळात सलमान खानचा खूप आधार दिल्याचं मान्य केलं होतं.