पहिल्या घटस्फोटानंतर आमिरला सलमानने दिला होता 'हा' सल्ला

सलमान खानने केली होती आमिरची मदत   

Updated: Jul 4, 2021, 12:08 PM IST
पहिल्या घटस्फोटानंतर आमिरला सलमानने दिला होता 'हा' सल्ला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी आपलं 15 वर्षांचं नातं संपवलं आहे. एक नोट लिहून या दोघांनी आपले रस्ते वेगळे झाल्याचं जाहीर केलं. जवळपास 16 वर्षांच्या नात्यानंतर आमिर खानने पहिली पत्नी रीना दत्तासोबतचं आपलं नातं तोडलं होतं. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. रीनाला घटस्फोट दिल्यानंतर एका मुलाखतीत आमिर खानने या काळात सलमान खानचा खूप आधार दिल्याचं मान्य केलं होतं. 

सलमान खानने केली होती आमिरची मदत 

करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण' मध्ये आमिरने सांगितलं होतं की,'एक अशी वेळ होती जेव्हा मला सलमान खानपासून लांब राहायचं होतं. मात्र त्यावेळी परिस्थिती अशी बदलली की, माझा घटस्फोट झाला आणि सलमानने माझ्या आयुष्यात प्रवेश केला. त्याने मला या परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली.'

'अंदाज अपना अपना' या सिनेमात सलमानसोबत काम करण्याचा आमिर खानचा अनुभव अतिशय वेगळा होता. मला त्याचं वागणं अजिबात आवडलं नाही. मला तो रागीट आणि थोडा बेशिस्त वाटत असे. कामाचा अनुभव बघता त्याच्यापासून लांब राहण्याचा निर्णय़ घेण्यात आला होता. 

आमिरला सलमान अजिबात आवडत नसे

आमिर खानने पुढे सांगितलं की,'सलमान खानने माझी त्या काळात मदत केली जेव्हा मला खूप एकटं वाटत असे. पत्नी रिनासोबत माझा घटस्फोट झाला होता. त्यानंतर सलमानने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अनेकदा भेटलो यातून मैत्री झाली.