'आत्महत्येचा विचार...', आमिरच्या लेकीचा भर रस्त्यातील 'तो' व्हिडीओ चर्चेत

Aamir Khan's Daughter on Suicide : आमिर खानची लेक आयराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आयरानं आत्महत्येवर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 11, 2023, 11:16 AM IST
'आत्महत्येचा विचार...', आमिरच्या लेकीचा भर रस्त्यातील 'तो' व्हिडीओ चर्चेत title=
(Photo Credit : Social Media)

Aamir Khan's Daughter on Suicide : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील ती चर्चेचा विषय ठरते. आयरानं काही दिवसांपूर्वी फिटनेस ट्रेनर नुपूरसोबत साखरपुडा केला. लवकरच ते लग्न बंधनात अडकतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेकांना प्रश्न पडला होता की आयरा आणि नुपूर रिलेशनशिपमध्ये कसे आले. आयरा अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये होती. त्यावेळी आत्महत्या करण्याचे विचार देखील आयराला यायचे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की  जेव्हा आयरा डिप्रेशनमध्ये होती तेव्हा तिला त्यातून बाहेर काढण्यात नुपूरची देखील मदत असल्याचे म्हटले जाते. काल 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस' (World Suicide Prevention Day) होता. त्यानिमित्तानं आयरा ही रस्त्यावर जनजागृती करताना दिसले. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

आयराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. व्हिडीओत आयरानं क्रॉप टॉप आणि ब्लॅक जीन्स परिधान केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत आयरा एका कॅफेच्या बाहेर असल्याचे पाहायला मिळते. त्यावेळी आयरा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाविषयी बोलत असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आयरा म्हणाली की 'आज सुसाईड प्रिव्हेन्शन डे आहे. म्हणजे आत्महत्येपासून एखाद्याला रोखण्याचा दिवस. आत्महत्या हा विचार खूपच भयानक आहे. हे लोक कोणाला काही सांगू शकत नाहीत. तुम्ही अशा लोकांना विचारलं त्याबद्दल तर त्यांना वाटेल की त्यांच्यासाठी कोणीतरी आहे. त्यामुळे यावर बोलताना घाबरायची गरज नाही, ज्यांच्याशी आपण यावर बोलू शकतो. आपण त्यांच्याशी या विषयावर बोललो तर उलट त्यांच्या मनात असे विचार येतील असं आपल्याला वाटतं पण असं होत नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'एकटेपणा जाणवत होता आणि रडायची...', प्रेग्नंसीनंतरच्या काळात इशिता दत्तानं केला नैराश्याचा सामना

आयराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, आमिर खानची लेक खूप चांगलं काम करत आहे. दुसरा नेटकरी म्हणाला की खूप चांगल काम करत आहेस. तिसरा नेटकरी म्हणाला की आयराचं मन खूप साफ आहे. तर काहींनी आयराच्या व्हिडीओकडे लक्ष न देता तिच्या कपड्यांवरून तिला ट्रोल केलं आहे. आयरानं वेस्टर्न कपड्यांवर म्हणजेच क्रॉप टॉप आणि जीन्सवर ट्रेडिश्नल कानातले घातले आहे. त्यामुळे अनेकांनी तिला कोणत्या कपड्यांवर कोणते कानातले घालावे हे कळत नाही असे म्हटले आहे. तर दुसरीकडे अनेकांनी कमेंट करत आमिरला तिच्या डिप्रेशनसाठी जबाबदार ठरवलं आहे.