आमिर खानने व्यक्त केली नागराज मंजुळेंसोबत काम करण्याची इच्छा, म्हणाला...

बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. 

Updated: Jul 21, 2022, 06:08 PM IST
आमिर खानने व्यक्त केली नागराज मंजुळेंसोबत काम करण्याची इच्छा, म्हणाला... title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. आमिर आणि त्याचं महाराष्ट्र आणि मराठी भाषेवर असलेलं प्रेम आपण बऱ्याचवेळा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून पाहिलं आहे. आमिरनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, आता आमिरचे लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

या भेटीमध्ये आमिर आणि नागराज मंजुळे यांनी खूप गप्पा मारल्या. एवढंच काय तर आमिरनं नागरजा मंजुळे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. 'सैराट', 'फॅन्ड्री', 'झुंड' अशा चित्रपटांचे प्रतिभावान दिग्दर्शक नागराज आणि आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा पर्फेक्शनीस्ट आमिर, मिळून नक्कीच एक जबरदस्त टीम बनेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या वेळी गप्पांमध्ये नागराज यांनी आमिरला रुपेरी पडद्यावर कोणती भूमिका साकारायची आहे याबद्दल विचारले. ज्यावर आमिर म्हणाला की, "मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट करायचा आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचं त्याला कौतुक वाटतं आणि त्याने तो प्रेरित आहे." 

दरम्यान, आमिरच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकतंच या चित्रपटातील 'कहानी' या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायकॉम 18 स्टुडिओज निर्मित, 'लाल सिंग चड्ढा' मध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य अक्किनेनी दिसणार आहेत. हा चित्रपट 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'लाल सिंग चड्ढा' 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.