Abhishek Bachchan बेरोजगार? नेटकरी आणि अभिषेकमध्ये जुंपली

अभिषेकनं त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. 

Updated: Oct 23, 2022, 01:16 PM IST
Abhishek Bachchan बेरोजगार? नेटकरी आणि अभिषेकमध्ये जुंपली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिषेक हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा अभिषेक ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतो. 

हेही वाचा : मराठी सिनेमा बॉलिवूडवर पडणार भारी, 'राम सेतू' आणि 'थॅंक गॉड' साठी ठरू शकतो धोका!

नुकताच ट्रोलिंगचा असाच एक प्रकार ट्विटरवर घडला असून तो ट्रोलरला अभिषेकनं सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिषेकनं यावेळी एका पत्रकाराला उत्तर देत 'लोक अजूनही वर्तमानपत्र वाचतात का?' असा सवाल केला. यावरून एका नेटकऱ्यानं अभिषेकला ट्रोल करत 'हो, हुशार लोक वाचतात. तुझ्यासारखे बेरोजगार नाही.' (abhishek bachchan sassy response for troller calling him unemployed) 

अभिषेकनं विनोदी उत्तर देत त्या व्यक्तीचे आभार मानले. 'अरे, हा! या माहितीबद्दल धन्यवाद. तसे, बुद्धिमत्ता आणि रोजगार यांचा संबंध नाही. तुमचंच उदाहरण घ्या. मला खात्री आहे की तुम्ही नोकरी करत आहात आणि तुमच्या ट्वीटनुसार मला याची खात्री आहे की तुम्ही हुशार नाही.'

abhishek bachchan sassy response for troller calling him unemployed

हेही वाचा : शॉर्ट्स घालून मंदिरात जाणं एकता कपूरला पडलं महागात, झाली ट्रोलिंगची शिकार

दरम्यान, अभिषेक लवकरच 'ब्रीद' सीझन 3 (Breathe 3 ) मध्ये दिसणार आहे.  या सीरिजची प्रदर्शनाची तारिख समोर आली असून 9 नोव्हेंबर 2022 रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. या वेब सीरिजमध्ये अभिषेक बच्चन आणि अमित साध मुख्य भूमिकेत आहेत.